इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीसाठी निवडयादी प्रसिद्ध  file photo
नाशिक

नाशिक : अकरावी प्रवेशांची दुसरी फेरी आजपासून

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बुधवारी (दि. ३) अर्जाचा भाग दोन भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असून शनिवार (दि. ६) पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील ६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रकिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार यंदा प्रवेशासाठी तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दुसऱ्या फेरीसाठीची प्रवेशप्रक्रिया मंगळवारी (दि. २) संपली. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना बुधवार (दि. ३) पासून अर्जाचा भाग दोन भरून पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी शनिवार (दि. ६) पर्यंत मुदत आहे.

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक असे...

अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत - ३ ते ६ जुलै

माहिती विश्लेषणासाठी मुदत - ७ ते ९ जुलै

दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी - १० जुलै सकाळी १० वाजता.

यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत - १० ते १२ जुलै

प्रवेशाची स्थिती अशी राहणार...

कॅप इंटॅक : ३२ हजार २३० कॅप प्रवेश : ६ हजार ७९

कॅप रिक्त जागा : १७ हजार १२४.

कोटा इंटॅक : ४ हजार ५५७, कोटा प्रवेश : ८२२

कोटा रिक्त जागा : ३ हजार ७०५

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT