नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर याठिकाणी सावकर दिंडी काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. विविध संस्था, संघटना आणि विद्यार्थ्यांनी सावरकर वाड्यात वंदे मातरम् चा जयघोष करत सावरकर यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाप्रसंगी सावरकर यांच्या जीवनपटावर आधारीत देशभक्तीपर गीतांचे देखील यावेळी सादरीकरण करण्यात आले. नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंखनाद करुन सावरकरांना मानवंदना दिली.
भगूरपासून दिल्लीपर्यंतचा राष्ट्रयात्रेचाही यावेळी शानदार प्रारंभ करण्यात आला. सुमारे 22 राज्यामधून ही यात्रा जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थान नाशिकमधील भगूर येथे अभिवादन सावरकर दिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध संस्था, संघटना व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर सावरकर वाड्यात विद्याथ् "वंदे मातरम्"चा जयघोष करण्यात आला. यावेळी सावरकरांच्या जीवनावर आधारीत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.