नाशिक : भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंगोली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केले होते. याप्रकरणी सावरकरप्रेमी देवेंद्र भुतडा यांनी 2020 मध्ये ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिक न्यायालयात कलम 500 व 504 अन्वये दावा दाखल केला होता.
मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयाने, कायदेशीर प्रक्रियेचे योग्य पालन केले नसल्याचा ठपका ठेवत हा दावा शुक्रवारी रद्द केला. यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.