Ratnagiri Crime News 
नाशिक

Nashik Satpur Murder Case | युवकाच्या खुनाचा 12 तासांत उलगडा

Nashik Satpur Murder Case | कामगारनगरचा संशयित नाशिकरोड रेल्वेस्थानकातून पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर येथील कामगारनगर परिसरात एका इमारतीच्या टेरेसवर आढळलेल्या युवकाच्या खुनाचा उलगडा सातपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत केला असून, संशयितास नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. कृष्णा राकेश दुसाने (२१, रा. कामगारनगर, सातपूर) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिलिंद शिंदे (२४, रा. कामगारनगर, सातपूर) हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार शनिवारी (दि. २०) सातपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली याप्रकरणी वैष्णव होती. तपास सुरू असतानाच रविवारी (दि. २१) कामगारनगरातील इमारतीच्या टेरेसवर अज्ञात युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व स्थानिक बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान कृष्णा राकेश दुसानेवर संशय बळावला.

तो नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातून मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपीने दिलेले ९ हजार रुपये वैष्णव शिंदेकडून परत मागितल्याने वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच १९ जून रोजी धारदार चाकूने छाती व गळ्यावर वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस ठाणे करीत आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार तसेच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक अनिल अहिरे, दीपक खनपुरे, तुषार देसले, सचिन सुनाळे, किशोर डुकरे, संतोष खाडे, सागर गुंजाळ, सचिन आंगणे, अमोल मोरे, संजय बडवे, पारस देशमुख, योगेश गायकवाड, रवींद्र जाधव, रोहितदास कनोजे, सुनील शिरसाठ व गोकुळ बावळे यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT