Nanded MIDC pudhari photo
नाशिक

Satpur Ambad MIDC | सुट्टी संपली; उद्योगांचे चाके पुन्हा वेगात

Satpur Ambad MIDC | सातपूर, अंबडमध्ये यंत्रांचा खडखडार सुरू; उत्पादन प्रक्रिया पूर्वपदावर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

दिवाळीच्या सणानिमित्त पाच दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर, रविवार (दि. १५) पासून सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांची चाके पुन्हा एकदा गतिमान झाली आहेत. दिवाळीचा आनंद, कुटुंबीयांसोबतचा सण आणि गावाकडचा मुक्काम आटोपून कामगार पुन्हा कामावर परतल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये पूर्वीसारखी लगबग सुरू झाली आहे.

बंद पडलेल्या यंत्रांचा खडखडार पुन्हा ऐकू येऊ लागला असून, कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रियेलाही वेग आला आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात दिवाळीनिमित्त बहुतांश कंपन्यांनी कामगारांना पाच दिवसांची सुटी जाहीर केली होती. शनिवारची साप्ताहिक सुटी आणि त्यानंतरची दिवाळी सुटी यामुळे सातपूर, अंबडसह चुंचाळे औद्योगिक परिसरातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रिया थांबली होती.

या काळात हजारो कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली. अनेक कामगारांनी मूळ गावी जाऊन सणाचा आनंद लुटला, तर काहींनी पर्यटन आणि कौटुंबिक भेटीगाठींना प्राधान्य दिले.

सुट्ट्यांचा कालावधी संपताच रविवारपासून औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा कामाची लगबग सुरू झाली. सकाळपासूनच कामगारांची कारखान्याकडे ये-जा सुरू झाली. कंपन्यांचे प्रवेशद्वार पुन्हा कामगारांच्या वर्दळीने गजबजले. उत्पादन विभाग, यंत्रसामग्री आणि विविध प्रक्रिया विभागांमध्ये कामकाजाला सुरुवात झाल्याने औद्योगिक परिसरातील वातावरण पुन्हा एकदा गजबजून गेले आहे.
दरम्यान, दिवाळीच्या काळात औद्योगिक वसाहतीमध्ये चोरी अथवा अन्य अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी उद्योजक आणि पोलीस प्रशासनाने विशेष सुरक्षाव्यवस्था ठेवल्याने एकही अनुचित प्रकार घडल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

एकूणच, दिवाळीच्या सुट्ट्यांत काही दिवस शांत झालेली सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये आता पुन्हा यंत्रांचा आवाज घमू लागला आहे. सणाचा आनंद घेऊन नव्या उत्साहाने कामावर परतलेल्या कामगारांमुळे नाशिकच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळाली आहे.

प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर

दिवाळीच्या सुट्टीपूर्वी पूर्ण झालेल्या उत्पादन कामकाजानंतर आता कंपन्यांनी नियमित उत्पादनाचे वेळापत्रक सुरू केले आहे. आगामी मागणी आणि प्रलंबित कामांचा विचार करता उत्पादन प्रक्रियेला गती देण्यावर उद्योगांचा भर राहणार आहे. सुट्टीमुळे थांबलेली पुरवठा साखळी, मालाची आवक-जावक आणि औद्योगिक व्यवहारही आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT