मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो वाहन पलटी झाल्याने अपघात झाला.  (छाया: अनिल गांगुर्डे)
नाशिक

Saptashrungi Temple | नवसपूर्तीसाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात

वणी नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला आपघात २25 जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

वणी (नाशिक) : सप्तशृंग गडावर देवीच्या नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो वाहनाचा रस्त्यावरील वळण घेत असतांना अंदाज न आल्याने वाहन पलटी झाल्याने अपघात घडला आहे.

अपघातामध्ये लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले असून अपघाताची माहिती कळताच नांदुरी पोलीस कर्मचारी मन्साराम बागूल, निलेश शेवाळे, नितीन देवरे यांनी तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ यांच्या सहकार्याने तत्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. परीसरातील स्थानिक तरुणांनी तात्काळ मदतीचा हात देऊ केल्याने जखमींना त्वरीत रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वणी येथे घेऊन जाण्यासाठभ मदत कार्य केले. तर नांदुरी येथील चालक मालक संघटनेने व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील, घनश्याम निकम यांनी मदत कार्य केले. वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डाॅक्टरांनी व शहरातील खाजगी डॉ. विराम ठाकरे , डॉ. अनिल पवार, डॉ. योगेश पाटील, डॉ. प्रकाश देशमुख आदीनी जखमींवर तत्काळ उपचार सुरु केले आहे. तसेच नांदुरी ॲम्बुलन्स प्रशांत पाटील डॉ.योगेश मांन्टे, वणि ॲम्बुलन्स घनश्याम निकम राजेश परदेशी प्रशांत चव्हाण डॉ. दिघोळे, कळवन ॲम्बुलन्स लक्ष्मण बहिरम डॉ राठोड, कनाशी ॲम्बुलन्स सचिन गांगुर्डे डॉ अक्षय होपळे यांनी देखील सहकार्य केले.

घटनास्थळी स्थानकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले.

जखमींची नावे अशी...

अपघातात वाहनातील एकूण पंचवीस प्रवाशी जखमी झाले असून सहा गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व भाविक वाशीम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे राहत असल्याचे समजते. आशाबाई खडसे, रोशनी बांगरे, प्रियांश जाधव, खुशी बोरकर, तनु खंदारे, अनिल बोरकर, आयोध्या जाधव, विलास पारवे, नंदा पारवे, ओम गायकवाड, गणेश बोरकर, हर्षदा बोरकर, शारदा बोरकर, अंबादास बोरकर, संजना हिवराळे, सखाराम पारवे, राधा पारवे, मनकणीबाई खरांदे, मनीषा बोरकर, गणेश बांगरे, छाया तांबे, एकनाथ हिरवाळे, शिवानी खंदारे, अर्चना पालवे, शोभा खंदारे जखमींची अशी नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT