50 हजार कोटींची कामे आगामी कुंभ मेळयासाठी होणार आहेत सध्या कामे सुरु आहेत. पण ही कामे सर्वसर्व गुजराती ठेकेदारांना दिली आहेत. हे काम पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी केला आहे. या ठेकेदारांची लिस्ट दिल्ली येथून आली होती. ते नाशिक स्मार्ट सीटी करणार होते. पण उत्तरेकडील शहरांपेक्षा वाईट अवस्था त्यांनी केली आहे. अशी थेट टिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर, नाशिक याठिकाणी शिवसेना मनसेची पहिली सभा पार पडली यावेळी संजय राऊत बोलत होते. पुढे ते म्हणाले या दोघांनी एकत्र येण म्हणजे महाराष्ट्राच्या मनातील आग बाहेर पडत आहे, श्रीरामांची- सावरकरांची भूमी नाशिक कुंभ नगरी लवकरच कुंभमेळा होईल जो भ्रष्टाचार माजलेला आहे तो या भगवेवाल्यांना दिसत नाही. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते पण आज नाशिकची अवस्था त्यांनी वाईट करुन ठेवली आहे.
इंजिन पुढे निघाले आहे त्याला ताकद देण्याचे काम शिवसैनिक व मनसैनिक करत आहेत. या टाळ्या शिट्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासाठी जमलेल्यासाठी नाशिक चांगले करायचे असेल तर शिवसेना मनसे युतीच्या पाठीमागे रहा असे आवाहन केले.