रूपाली चाकणकर File Photo
नाशिक

Rupali Chakankar | राजीनाम्याची मागणी करणे विरोधकांचे कामच

रूपाली चाकणकर यांची टीका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचे काम केले जाते. मात्र, कोणत्याही घटनेनंतर राजीनामा मागणे एवढेच काम विरोधकांना उरले आहे, ते उद्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागतील, अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे. राज्य महिला आयोग 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत जनसुनावणीसाठी चाकणकर नाशिकला आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांकडून होणारी टीका त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला उत्तर दिले.

चाकणकर म्हणाले, अनेक महिला मुंबई येथील कार्यालयात येऊ शकत नाहीत. पण, आयोग त्यांच्या दारापर्यंत येऊ शकतो या भूमिकेतूनच या सुनावणीचे आयोजन केल्याचे सांगितले. तसेच महिलांच्या बाजूने कायदा आहे. मात्र, त्यातून पळवाट काढली जाते. तक्रारीचे निवारण करण्यासाठी पॅनल तयार करण्यात आले आहेत. महिला तक्रारींची दखल पोलिस आणि इतर कोणत्याही यंत्रणांनी घेतली नाही तर शेवटी महिला आयोग आहे. तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी आयोगाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

परिणय फुकेंसंदर्भातील तक्रार नव्हती

वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत त्या म्हणाल्या की, सामोपचाराने भूमिका घेणे, समेट घडवून आणणे ही आमची भूमिका आहे. पण, पोलिसांकडून दिरंगाई झाली त्याची चौकशी केली जात आहे, परिणय फुके यांच्या कुटुंबाबाबत आम्हाला माहिती नव्हती. आमच्याकडे तक्रारी आल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयोगाकडील तक्रारी अशा

  • वैवाहिक कौटुंबिक समस्या 98

  • सामाजिक समस्या 4

  • मालमत्ता / आर्थिक समस्या 4

  • कामाच्या ठिक़ाणी छळ 1

  • इतर 7

  • एकूण 114

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT