Admission Fraud Pudhari
नाशिक

RTE Admission 2026-27 | दिंडोरी तालुक्यात आरटीई प्रवेशाचा बिगुल वाजला! 25 टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

RTE Admission 2026-27 | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांत प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांत प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

त्यानुसार मंगळवारी (दि. १७) पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सर्व संबंधित शाळांनी नोंद घेऊन त्याबाबत कार्यवाही करावी. तसेच ही माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या शाळांचा समावेश

आत्मा मालिक जऊळके, किशोर सूर्यवंशी - मानोरी, निक्स इंग्लिश उमराळे, आदर्श इंग्लिश वणी, संताजी इंग्लिश मीडियम वणी, ग्लोबल इंटरनॅशनल ढकांबे, ग्लोबल पब्लिक ढकांबे, आदर्श इंटरनॅशनल खेडगाव, आदर्श इंग्लिश मीडियम दिंडोरी,

अभिनव बाल विकास दिंडोरी, बालभारती पब्लिक स्कूल दिंडोरी, निर्मिती इंटरनॅशनल कोहाटे, अभिनव बालविकास निळवंडी, अभिनव बालविकास खेडगाव, उषाताई देशमुख लखमापूर, अभिनव बालविकास करंजवण, कादवा इंग्लिश मीडियम राजारामनगर,

अभिनव बालविकास मोहाडी, अभिनव बालविकास कोऱ्हाटे, ऋषिलँड उड्डाण इंग्लिश करंजी, उत्कर्ष पॉलिक ढकांबे, श्री ईशान्येश्वर इंग्लिश दिंडोरी, गोल्डन डेज युनिव्हर्सल दिंडोरी, गुरुकुल इंटरनॅशनल दिंडोरी, बालभारती पब्लिक दिंडोरी, अभिनव बालविकास वरखेडे, गोल्डन डेज युनिव्हर्सल उमराळे, एकूण ३६३ जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण यांनी दिली आहे.

कायद्यांतर्गत प्रवेश कोणाला

शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवल्या जातात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT