नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली तब्बल ३५ हजार कोटींची उधळपट्टी सुरू असून, धर्माच्या नावावर सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा उघडा खडा टाकला आहे. यूपीत प्रयागराजला अवघ्या हजार कोटींमध्ये कामे झाली, मग, नाशिकमधील ३५ हजार कोटी नेले कुठे? चांगल्या रस्त्यांची चाळण करून निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत.
ज्यामुळे अपघातात निरपराध नागरिकही गेलेत. हा पैसा सत्ताधाऱ्यांच्या बापाचा नसून, जनतेचा आहे. या महोत्सावात केवळ नेतेच नाही, तर भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही, असा इशारा देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, उत्तर प्रदेशहून आलेल्या अधिकारीानी व महाजनांनी आयात केलेल्या मजुरांतील अधिकारीानी नाशिकची लूट चालवली आहे. रिंगरोडचे कॉन्ट्राट आणि पैसे महाजनांच्या नातेवाईकांच्या पदरात असल्याचा आरोप करीत, या संपूर्ण कामामध्ये ७ ते ८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला.
एका झटक्यात अधिकाऱ्यांनी... अन्यथा तीव्र आंदोलन
महाकुंभ मेळाव्याचे मनसुबे गोदावरीचे पाणी आहे, या लोकांना पाणी बचायचे आहे, पण, ते पाणी इथे दिसत नाही. पाण्याच्या बाजूला बंशरा बांधला पाहिजे. एमआयडीसी आणि प्रदूषण विभाग यांना २० दिवस मुदत देतो, जिथे केमिकलचे पाणी कंपनीमधून टाकले जात आहे, तयार काम केले नाही, तर महागात पाणी कंपनीमधून टाकले जात आहे. आमच्याकडे माहिती आहे की, भ्रष्टाचाराचा झाला आहे. एक-एक रुपयाचा हिशोब आम्ही घेणार.
ठराविक कालावधीत काही लोकांनी माहिती दिली की, मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती द्यायची नाही, असे सांगितले आहे. माहितीसाठी १० दिवसांत मुदत देतो, तोपर्यंत माहिती दिली नाही, तर आम्ही सोडणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मंत्री महाजन यांनी जळगावचे अधिकारी आणले आहेत. नाशिकचे अधिकारी काम करू शकत नाहीत का? मंत्री महाजन यांच्या ओळखीच्या बगलबच्यांचा ७ ते ८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशाराही आमदार रोहित पवारांनी यावेळी दिला.
कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचा खर्च सांगतहात. पण, कामे बघून तसे दिसत नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुंभमेळा आयुक्त यांना पत्र दिले आहे. आमच्याकडे माहिती आहे, भ्रष्टाचार झाला आहे. एक-एक रुपयाचा हिशोब आम्ही घेणार. ठराविक कालावधीत काही लोकांनी माहिती दिली की, मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती द्यायची नाही, असे सांगितले आहे.
माहितीसाठी १० दिवसांत मुदत देतो, तोपर्यंत माहिती दिली नाही, तर आम्ही सोडणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मंत्री महाजन यांनी जळगावचे अधिकारी आणले आहेत. नाशिकचे अधिकारी काम करू शकत नाहीत का? मंत्री महाजन यांच्या ओळखीच्या बगलबच्यांचा ७ ते ८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, असा इशाराही आमदार रोहित पवारांनी यावेळी दिला.
प्रयागराज कुंभमेळ्यासाठी ७,५०० कोटी, मग नाशिकच्या ३५ हजार कोटींच्या कामांचा थांगपत्ता का नाही?
रिंगरोडचे काम आणि मलिदा थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या नातेवाईकांच्या पदरात.
कुंभमेळ्याच्या कामात तब्बल ७ ते ८ कोटींचा उघड भ्रष्टाचार.
पवित्र घाटांची तोडफोड, महंतांचा अपमान आणि भुजबळांना डावलले.
कमिशन लाटण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले ऐतिहासिक घाट पोकवरून उध्वस्त केले.
अमेरिकेत खळबळ, नाशिकमध्ये दुर्लक्ष; पाण्यात ५० पट घातक क्रोमियम.
अबंड परिसरात थेट गटारीचे पाणी आणि विष्टा थेट गोदावरी नदीपात्रात.
अमेरिकेत पाण्यात ०.८ क्रोमियम आढळल्यास गदारोळ होतो, नाशिकमध्ये तब्बल ५० पट अधिक विषारी क्रोमियम.
आम्ही धार्मिक आहोत, पण धर्माचा बाजार आणि भ्रष्टाचाराचा खडा सत्ताधाऱ्यांनी टाकला, तर तो मुळीच खपवून घेणार नाही.
हा पैसा सत्ताधाऱ्यांच्या घरचा नाही, सर्वसामान्य जनतेचा आहे. नेते तर सुटणार नाहीत, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही.
नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासमोर नाशिककरांनी गोदादूषणाबाबत तक्रारीचा पाढा वाचला. नुकत्याच पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्याच्या म्हणजेच नंतर त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि गांधी तलाव परिसराची स्वतः स्थिती जाणून घेतली. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी गोदावरीतील वाढते प्रदूषण आणि मुलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत आ. पवारांकडे तीव्र गाऱ्हाणे मांडले.
पाहुणींदरम्यान स्थानिक रहिवासी व माविकांनी गोदावरी पात्रातील अत्यंत खालावलेली पाण्याची गुणवत्ता आणि ऑक्सिजनचे नगण्य प्रमाण या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. 'नիրী' च्या स्पष्ट मार्गदर्शकतत्वानुसार नदीपात्रात कॉंक्रिटिकरण प्रतिबंध असतानाही प्रशासनाकडून नियम धाब्यावर बसवून कॉंक्रिटिकरण केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या कामामुळे परिसरातील नैसर्गिक जीवंत झरे बुजले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आली.
घाटांवर महिलांसाठी वस्त्रगाळगृह आणि पुरुष सार्वजनिक स्वच्छतागृhaचा अभाव असल्यामुळे माविकांचे हाल होत असल्याची सांगण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या ध्वजारोहण सोहळ्यात स्थानिक नाशिककरांना सहभागी होण्याची योग्य संधी न मिळाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी आ. रोहित पवार यांनी व्यग्रस्थम व ध्वजाबाबतची माहिती घेत स्थानिक पुरोहितांशी चर्चा केली आणि समस्या समजून घेतल्या.
रामकुंडावरील पाहणी झाल्यानंतर आ. रोहित पवार यांनी नेहमीप्रमाणे व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे दुचाकीवरून भेट काळाताराम मंदिरापर्यंत प्रवास केला. मागील नाशिक दौर्यात त्यांनी रिक्षाने दर्शन घेतलेला होता. काळाराम मंदिरात प्रमुख श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.