राज्यात वाढले तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे Pudhari File Photo
नाशिक

Road Network : राज्यात वाढले तीन हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे

2023 मध्ये एकूण लांबी 3.25 लाख, तर 2024 मध्ये 3.28 लाख

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिलीप सूर्यवंशी

राज्यात वर्षभरात सुमारे 3,000 किलोमीटर रस्त्यांची वाढ झाली आहे. या वाढीत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांचा समावेश आहे. 2024 मध्ये रस्त्यांचे जाळे 3.28 लाख किमी इतके वाढले आहे. 2023 मध्ये 3.25 लाख किमी इतके होते. ही वाढ मुख्यतः ग्रामसडक योजना, महामार्ग प्रकल्प आणि जिल्हास्तरीय रस्त्यांच्या दुरुस्ती-दर्जोन्नतीमुळे झाली आहे. म्हणजेच एका वर्षात रस्त्यांच्या जाळ्यात 3 हजार किलोमीटरने वाढ झाली आहे.

रस्त्यांच्या जाळ्यात 3 हजार किलोमीटरची जी वाढ नोंदविण्यात आली, त्यामध्ये मुख्य जिल्हा मार्गांत 2 हजार 604 किलोमीटरने, तर राज्यमार्गांमध्ये 457 किमीने वाढ झाली. राष्ट्रीय महामार्ग, इतर जिल्हा रस्ते, आणि जिल्हा रस्ते यामध्ये विकसनशीलता किंवा नवीन कामांची नोंद नाही.

केंद्र आणि राज्य शासनाकडून लागू असलेल्या सडक योजनांमुळे ही वाढ लागू

1. राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत नवीन मार्गांची निर्मिती व जुन्या मार्गांचे रुंदीकरण झाले. नवीन फोर लेन व सिक्स लेन महामार्ग जोडले गेले.

2. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक राज्य महामार्गांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण केले. जिल्हा मुख्यालये, तालुका व गावांना जोडणारे रस्ते सुधारण्यात आले.

3. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना - दुर्गम व ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काँक्रीट व डांबरी रस्ते बांधले गेले. यामुळे ग्रामपातळीवर रस्त्यांची वाढ लक्षणीय झाली.

4. आशियाई विकास बँकेचा निधी - एडीबीच्या साहाय्याने काही टप्प्यांमध्ये शेकडो किमींचे रस्ते सुधारले गेले.

5. पूल, बायपास व जोडरस्ते - महामार्गांना जोडणारे बायपास व लहान-मोठे पूल उभारल्यामुळे एकूण लांबी वाढली.

राज्यात अवघ्या दोन वर्षातच रस्त्यांच्या संख्येत वाढ झाली.

राज्य व केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

सुरुवात : 2000 मध्ये केंद्र सरकारकडून.

उद्देश : ग्रामीण भागातील सर्व हवामानात वापरता येणारे रस्ते बांधणे.

लाभ : दुर्गम व लहान गावांना मुख्य बाजारपेठ, शाळा, दवाखाना, तालुका व जिल्हा मुख्यालयांशी जोडणी.

महाराष्ट्रात हजारो गावांचा यात समावेश झाला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

सुरुवात : महाराष्ट्र शासनकडून

उद्देश : ज्या गावांचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश नाही, त्यांना रस्ते सुविधा उपलब्ध करून देणे.

या योजनेतून तालुका व गावांदरम्यान रस्ते बांधकाम व डांबरीकरण केले जाते.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प

उद्देश : राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण, चौपदरीकरण, द्रुतगती मार्ग बांधकाम. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हे याचे महत्त्वाचे उदाहरण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT