महसूल विभाग नाशिक pudhari news network
नाशिक

Nashik News | महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचारी आजपासून कामावर रुजू होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महसूल विभागासाठी दांगट समितीचा अहवाल स्वीकारण्यासह अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन अपर मुख्य सचिवांनी महसूल कर्मचारी संघटनेला दिले. त्यामुळे गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आला. (protest of Revenue Employees)

गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेला राज्य महसूल कर्मचा-यांचा संप स्थगित झाला असून कर्मचारी आजपासून कामावर रुजू होत आहेत.

संप मागे घेत असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष जीवन आहेर व जिल्हाध्यक्ष तुषार नागरे यांनी मंगळवारी (दि.२३) दिली. शासनदरबारी प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी दोन आठवड्यांपासून विविध मार्गाने आंदोलनाची भूमिका घेतली. त्यातही मागण्या मान्य होत नसल्याने गेल्या सोमवार (दि.१५)पासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. अखेर राज्याचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत मागण्यांबाबत आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवार (दि. २४)पासून महसूलचे कामकाज पूर्वपदावर येणार आहे. (protest of Revenue Employees)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT