नाशिक

Eknath Khadse | राज्यातील फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचले नाही

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेला अनुकूल एक्झिट पोल मध्येही दिसते आहे. मोदीजींचे सरकार केंद्रात येईल असा विश्वास आहेच, जनतेनेही दहा वर्षात त्यांनी केलेल्या कामावर विश्वास दाखवला आहे. मात्र राज्यातील महायुतीवर जनतेने नाराजी दाखवलेली दिसते आहे. राज्यातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण पटलेले दिसत नसल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदे सेनेवर काय म्हणाले?

  •  शरद पवार यांच्या पक्षाला दहा पैकी सहा ते आठ जागा येताना दिसताय म्हणजे जनतेने शरद पवारांच्या पक्षावर विश्वास ठेवलेला आहे.
  • अजित दादांच्या राष्ट्रवादीवर लोकांनी विश्वास ठेवल्याचे दिसत नाही असेही खडसे स्पष्ट बोलले.
  • तर उद्धव ठाकरेंचे दुसऱ्या क्रमांकाचे खासदार निवडून येतील असे दिसते आहे.
  • म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जे फोडाफोडीचे राजकारण करुन शिवसेना ताब्यात घेतली ते लोकांना मान्य झालेले दिसत नाही.
  • लोकांची सहानुभूती ठाकरेंना मिळालेली आहे असेही खडसे म्हणाले.

राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावी ठरले

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस नरेंद्र मोदी यांनी 400 पारची घोषणा दिली होती. ते चारशे पर्यंत जातील असे वाटले नव्हते. मात्र त्यांनी दहा वर्षात केलेल्या कामांवर विश्वास जनतेने दाखवला आहे. काही नकारात्मक गोष्टीही आहे, शेतकरी नाराज आहेत, बरोजगारीचाही विषय आहे. पंरतु याहीपेक्षा राष्ट्रीय मुद्दे अधिक प्रभावी ठरल्याचे दिसते आहे. तर महाराष्ट्राचा विचार करता युतीपेक्षा महाविकासआघाडीला जनतेने पसंती दिली आहे. जनतेला राज्यातील फोडाफोडीचे राजकारण मान्य झालेले नाही असे खडसे म्हणाले.

महाजनांनी घेतला समाचार

खडसे यांच्या या विधानावर गिरीश महाजन यांनी खडसेंचा समाचार घेतला आहे. त्यांनी आमची चिंता न करता आधी ते कोणत्या पक्षात आहे ते जाहीर करावे असा टोला ना. गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला आहे.

पंतप्रधान मोदींनी 400 पार ची घोषणा केली होती. जवळपास 400 ते 375 जागा एक्झिट पोलवर दाखविल्या जात आहे. त्याआम्ही नक्कीच पार करु. महाराष्ट्रात देखील महायुती कमी राहणार नाही. 34 ते 35 आकडा आम्ही महाराष्ट्रात नक्कीच पार करु. तसेच खडसेंवर टीका करताना त्यांनी आमची चिंता करू नये त्यांनी आधी ते कोणत्या पक्षात आहे ते सांगावे. खडसेंच्या भाजपप्रवेशावर विचारले असता तो वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न असून मला त्याबद्दल माहिती नसल्याचे महाजन म्हणाले.

हेही वाचा-

SCROLL FOR NEXT