देवळाली कॅम्प : शिवसेना उद्भव ठाकरे गटातर्फे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना उपनेते रवींद्र मिलेकर. व्यासपीठावर दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, रिटा वाघ, विलास शिंदे, योगेश घोलप, राहुल ताजनपुरे, प्रकाश म्हस्के, नयना घोलप, सुनीता कोठुळे, लीलाबाई गायधनी. (छाया : सुधाकर गोडसे)
नाशिक

Ravindra Mirlekar | बूथप्रमुख सक्षम करा, अन्यथा देवळालीत वेगळा विचार करावा लागेल

Nashik | बूथ प्रमुखांचा मेळावा: रवींद्र मिर्लेकरांकडून पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प: १९९० ते २०१९ पर्यंत देवळाली मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकत होता. मग २०१९ ला असे काय झाले की आपला पराभव झाला. तुम्ही गाफील राहिलात की संघटन कमी पडले. येत्या आठ दिवसात बुधप्रमुख कार्यान्वित करा व पुन्हा शिवसेनेचा झंझावात निर्माण करा. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड दम शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी मेळाव्यात दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली मतदारसंघाच्या बूथ प्रमुखांचा मेळावा विहितगाव येथे उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे व योगेश भोर यांनी आयोजित केला. आयोजित मेळाव्यात मंचावर लोकसभा संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, संपर्कप्रमुख रिटा वाघ, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, माजी महापौर नयना घोलप, सुनीता कोठुळे, लीलाबाई गायधनी, राहुल ताजनपुरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेची खरी ताकद ग्रामीण भागात असून आगामी भगव्या सप्ताहातून प्रचार व त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. योगेश घोलपांसारखा तरुण आमदार पुन्हा या मतदारसंघातून विधानभेवर पाठविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. देवळाली, नांदगाव, मालेगाव बाह्य, निफाड, सिन्नर, इगतपुरी, नाशिक मध्य व पश्चिम या मतदार संघापैकी किमान सहा मतदारसंघातून भगवा फडकावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी गद्दारांचे सरकार पाडण्यासाठी व उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपल्यासह परिसरातील प्रत्येक घरोघरी शिवसेना व सदस्य तयार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. यावेळी जिल्हा पदाधिकाऱ्यांचे इतरांनीही विचार व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT