Suregaon Instagram video case (Pudhari Photo)
नाशिक

Nashik Sex Scandal| नोकरीचे आमिष अन् महिलांचे शोषण! सातपूरमधील 'त्या' व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील एरंडे पोलिसांच्या जाळ्यात

Nashik Sex Scandal| आरोपीच्या कार्यालयातून सापाची कात हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर परिसरातील सेक्स स्कँडल प्रकरणातील प्रमुख संशयित रवींद्र एरंडे याची पोलिस कोठडी वाढवण्यात आली असून, त्याला १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी तपास अधिकारी म्हणून सात दिवसांची कोठडी मागितली होती.

मात्र, न्यायाधीश पी. एन. पांढरे यांनी चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी (दि. ३) एरंडेला अटक करण्यात आली होती. मुलाला चांगली नोकरी लावून देतो, भविष्य उज्ज्वल करून देतो, असे आमिष दाखवत त्याने एका महिलेवर नाशिक व इगतपुरी परिसरासह विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

याच प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यात एरंडेचे विविध महिलांसोबतचे तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. एरंडेच्या कार्यालयातील ऑफिसबॉयने हार्ड डिस्क चोरून त्यातील व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी एरंडेने सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ऑफिसबॉय आकाश बकरे आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या टॅबमध्ये एरंडेचे १२१ व्हिडिओ सातपूर पोलिसांना आढळले. पोलिसांनी पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर एका महिलेने एरंडेविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली.

न्यायालयातील युक्तिवादात तपास अधिकारी सचिन बारी यांनी संशयित आरोपी तपासात सहकार्य करत नाही. आरोपीच्या कार्यालयातून प्राण्याची कातडी हस्तगत झाली आहे. व्हिडिओमधील महिलांची ओळख पटवण्यासाठी तपास आवश्यक आहे.

तसेच कार्यालयाच्या झडतीत आर्थिक व्यवहारासंदर्भात कागदपत्रे सापडली असून, व्हिडिओ चित्रीकरणाबद्दलही अजूनही माहिती घेणे सुरू असल्याचा युक्तिवाद केला, तर एरंडेचे वकील अॅड. अरुण दोंदे यांनी सापाची कात ही अतिशय सर्वसामान्य बाब आहे. २ एप्रिलपासून संशयित ताब्यात आहे.

दाखल आरोपांमध्ये आर्थिक व्यवहाराचे कलम नसल्याने कोणता आर्थिक व्यवहार पोलिसांना तपासायचा आहे? पोलिसांना जर सात महिलांचे जाबजबाब घ्यायचे आहे, तर त्यासाठी आरोपीच्या कस्टडीची गरज काय, असा युक्तिवाद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT