Ratnagiri ST Division File Photo
नाशिक

Ratnagiri ST Division | दिवाळीनिमित्त रत्नागिरी एसटी विभागाकडून तब्बल साडेतीनशे 'लालपरी' सोडण्याचे विशेष नियोजन

Ratnagiri ST Division | 6 ते 14 नोव्हेंबर दरम्यान एसटीचे विशेष नियोजन, ऑनलाइन बुकिंगला जोरदार प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
नोकरी, व्यवसाय, कामानिमित्त वास्तव्यास असणारे इतर जिल्ह्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने दिवाळीनिमित्त आपल्या मुळगावी जात असतात. त्यामुळे दिवाळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा यासाठी रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीने ६ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह विविधठिकाणी दररोज ३५ बसेस अशा दहा दिवसांत ३५० एसटी बसेस धावणार आहेत. यासाठी ऑनलाइन बुकींगला सुरुवात झाली आहे.

येत्या ५ नोव्हेंबरपासून शाळा-महाविद्यालयांस दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहेत. काहीजण आपल्या मूळगावी, पर्यटनाला तर कामानिमित्त, नौकरीनिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.

आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासी आपल्या हक्काच्या लालपरीलाच पसंती देत असतो. त्यामुळे रत्नागिरी विभागाच्या वतीने दररोज ३५ बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील चाकरमानी, प्रवाशांनी आताच तिकीट आरक्षण करून घ्यावे, असेही आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

याठिकाणी धावणार लालपरी:

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, बीड, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात दिवाळीसाठी गाड्या धावणार आहेत.

दिवाळीत मिळणार सवलतीचा लाभ:

दिवाळीनिमित्त तरुणी, महिला, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत, ७५ वर्षापुढील ज्येष्ठांना शंभर टक्के सवलत असून मोफत प्रवास असणार आहे. सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक असणार असून प्रवाशांनी कार्ड जवळ बाळगावे, रिचार्ज करून ठेवावे. कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT