ration card verification Pudhari
नाशिक

Sinnar Ration Card eKYC | सिन्नर तालुक्यात ई-केवायसीअभावी 23 हजार 501 लाभार्थ्यांचे रेशन आले धोक्यात

Sinnar Ration Card eKYC | ई-केवायसी करून घ्यावी : तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय अनुदानित धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मात्र, सिन्नर तालुक्यात अद्याप २३ हजार ५०१ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.

तालुक्यात एकूण २ लाख ११ हजार ९७५ लाभार्थी असून, त्यापैकी १ लाख ८८ हजार ४७४ लाभार्थ्यांची म्हणजे सुमारे ८८.९ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून ११.१ टक्के बाकी आहे. उर्वरित लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी स्वस्त धान्य दुकानात जाणे शक्य नसल्यास शासनाने घरबसल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित सदस्यांचा भविष्यातील धान्यलाभ बंद होण्याची शक्यता असल्यामुळे लाभार्थ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.

सिन्नर तालुक्यातील ई-केवायसी स्थिती

  • एकूण लाभार्थी : २,११,९७५

  • ई-केवायसी पूर्ण : १,८८,४७४

  • ई-केवायसी बाकी : २३,५०१

अशी करावी ई-केवायसी

ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांनी प्ले स्टोअरवरून 'Mera eKYC App' डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करावी. तसेच स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनद्वारेही ही प्रक्रिया करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT