Municipal Corporation Election आज ज्या महापालिकेच्या निवडूका घेत आहेत त्यात भाजपाने दडपशाही मार्ग अवलंबला आहे. उमेदवारीसाठी माणसे विकत घ्यायची, दहशत निर्माण करायची , धमकी देणे ही कुठल्या प्रकारची निवडणूक आहे, प्रत्येक उमेदवारीसाठी 5 - 5 कोटी दिले जातात. प्रत्येकाला पैसे वाटप सुरु आहे इतका पैसा भाजपकडे आला कुठून असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. 4 वर्षे निवडणूका का झाल्या नाहीत त्याचे उत्तर भाजपाने द्यावे असेही ते म्हणाले.
शिवसेना - मनसेच्या पहिल्या संयुक्त सभेत ते बोलत होते. नाशिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ग्राऊंड), शिवाजी नगर येथे झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत उपस्थित होते.
पुढे राज ठाकरे म्हणाले की 1952 साली भाजपाला प्रचारासाठी माणसे भाड्याने घ्यावी लागतात हे दुर्देव आहे. ते म्हणाले इतका चुकीचा कॅरम फूटला आहे की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या छिद्रात हे कळत नाही, दररोज एक वेगळया पक्षात जातो हे सर्व भाजपाने सुरु केले.
भाजपाने स्वताच्या पक्षातील झाडे छाटण्याचे काम भाजपकडून
पुढे ते म्हणाले की झाड छाटायच्या अगोदर स्वताच्यास पक्षातील लोक छाटले बाहेरुन झाडे मागवली आणि आता ते पक्षात लावत आहेत. असे ठाकरे म्हणाले. तर पुढील कुंभमेळा होत आहे त्यासाठी प्रचंड झाडांची कत्तल केली जात आहे. कुंभमेळ्याला आलेले साधू संत येथून निघून गेलेकी ही रिकामी झालेली जागा ठेकेदारंच्या घशात घालायचा आहे. पुढे ते म्हणाले की नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती त्यावेळी अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला आमच्यावेळी त्यावेळी एकही झाड कापले नव्हते. आमच्यावेळी नाशिक महापालिकेचा असा कारभार चालवला होता की एकाही विरोधी पक्षांनी बोट दाखवले नव्हते.