नाशिक पश्चिम मतदारसंघ काबीज करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. file
नाशिक

Raj Thackeray Nashik Sabha | राज ठाकरे यांची उद्या सिडको, सातपूरमध्ये सभा

Nashik West Assembly Election | दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी सभा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मनसे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी (दि. १६) सिडको आणि सातपूरमध्ये सभा होत आहे. सातपूर, अशोकनगर येथील शिवजन्मोत्सव मैदान (जाणता राजा) येथे सायंकाळी ५ वाजता, तर सिडको, पवननगर स्टेडियम येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे.

कधी काळी बालेकिल्ला असलेला नाशिक पश्चिम मतदारसंघ काबीज करण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. या मतदारसंघात मनसेकडून दिनकर पाटील मैदानात असून, त्यांना मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा बघता मनसेमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मनसेने जिल्ह्यात पाच उमेदवार दिले असले, तरी राज ठाकरे नाशिक पश्चिममध्येच एकाच दिवशी दोन सभा घेणार असल्याने, त्यांच्या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यातील विविध भागांत होत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभा गाजत असून, त्यांच्याकडून सभांमधून राज्यातील राजकारणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे नाशिकच्या सभेत ते कोणावर बाण सोडणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, या सभेसाठी उमेदवार दिनकर पाटील व मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT