नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवार (दि.२३)पासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेणार आहेत.
लोकसभा, विधानसभेनंतर सर्वच पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मनसेमध्येदेखील याबाबतच्या हालचाली बघावयास मिळत आहेत. दरम्यान, राज ठाकरे आपल्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, मतदारसंघनिहाय आढावा घेणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांचे नाशिक येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ग्रामीण पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांची बैठक होईल. तसेच शहराचादेखील त्यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या तीन दिवसीय दौऱ्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.