देवळाली कॅम्प: रेल्वे दादर आणि भुसावळ दरम्यान १०४ सेवांसाठी विशेष गाड्यांची सेवा सुरू करणार आहे. रेल्वे विशेष गाड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १०४ सेवांसाठी खालील विशेष गाड्यांची सेवा रेल्वे सुरू ठेवणार आहे. (104 special trains between Dadar-Bhusawal)
दादर - भुसावळ - दादर त्रि-साप्ताहिक विशेष (09051) ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२४ (३९ सेवा) पर्यंत चालेल.
गाडी क्र. 09052 त्रि-साप्ताहिक विशेष दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी चालविण्यात येईल.
दादर -भुसावळ - दादर साप्ताहिक विशेष (गाडी क्र. 09049) ४ ऑक्टोबर ते २७ डिसेंबर २४ (१३ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यात येईल.
09050 साप्ताहिक विशेष ४ ऑक्टोबर ते २७ डिसेंबर २४ (१३ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यात येईल.
या सर्व गाड्यांच्या वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.