नाशिकरोड: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वसमावेशक मोबाईल अॅप 'रेलवन' लाँच केले आहे.
'रेलवन' अॅपद्वारे आरक्षित- अनारक्षित तिकीट, पीएनआर व ट्रेन चौकशी, यात्रा नियोजन, रेल मदत, भोजन बुकिंग तसेच मालवाहतूक सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. 'रेलवन' अॅपमध्ये सिंगल साइन-ऑन, ई-वॉलेट, सुरक्षित लॉगिन व सोपी नोंदणी अशी वैशिष्ट्ये असून, यामुळे अनेक अॅप्सची गरज संपुष्टात आली आहे. डिजिटल भारताच्या दिशेने हे पाऊल प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक अभिनव आणि सर्वसमावेशक मोबाईल अॅप रेलवन (RailOne) ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करु शकतात.
रेलवनचे वैशिष्ट्य : सिंगल साइन-ऑन
रेलवन अॅपमध्ये सिंगल साइन-ऑन फीचरद्वारे, वापरकर्ते रेल कनेक्ट किंवा युटीएस ऑन मोबाईल अॅपमधील यूजर आयडीचा वापर करून लॉगिन करू शकतात. त्यामुळे अनेक अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज राहत नाही आणि मोबाईल स्टोरेज देखील वाचवता येतो. रेलवन अॅपमध्ये रेल्वे ई-वॉलेट सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तिकिट बुकिंग अधिक जलद व सोपे होते. यासोबतच, सांख्यिक एमपीन आणि बायोमेट्रिक लॉगिन यासारख्या सुरक्षित आणि सोप्या लॉगिन पर्यायांनी अॅपचा वापर अधिक सुलभ करुन दिलेला आहे.
ॲपवरील जलद नोंदणी प्रक्रिया कमीत कमी माहितीवर आधारित असून, ती अतिशय सोपी आणि झपाट्याने पूर्ण होते. केवळ चौकशी करणारे वापरकर्ते देखील गेस्ट लॉगिन वापरून मोबाईल क्रमांक व ओटीपीच्या सहाय्याने लॉगिन करू शकतात.