राहुल गांधी  file photo
नाशिक

Rahul Gandhi to address tribal students| आदिवासी विद्यार्थी आंदोलनात राहुल गांधी?

उद्या निवासी प्रशिक्षण शिबिरात करणार मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांमधील सुविधा आणि पोषण आहाराबाबत काढलेल्या वादग्रस्त शासन निर्णयाविरोधात आक्रमक झालेले आदिवासी विद्यार्थी मंगळवारी (दि. १) नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढणार आहेत. दरम्यान, या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोर्चात सहभागी झाले नाही तरी, आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानानिमित्त पक्षाचे नेते राहुल गांधी बुधवारी (दि. २) नाशिकला येत आहेत. 'संघटन सृजन अभियाना' अंतर्गत राज्यातील जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होत आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांची माहिती अंत्यत गोपनीय राखली जात आहे. असे असले तरी आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या आंदोलकांची ते भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील ७८ जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी नाशिकमधे दाखल झाले आहेत,

गेल्या दहा दिवसांपासून संघटन सृजन हे प्रशिक्षण शिबीर सुरू होते. त्यातील पक्षांतर्गत घटना व घडामोडींविषयी जाहीर वाच्यता केली जात नाही. तसेच राहुल गांधी हे नाशिकला येत असले तरी त्यांच्या दौऱ्याबाबत कमालिची गोपनियता राखली जात आहे. प्रशासनाने त्यांच्या दौऱ्याविषयी फक्त बुधवारची वेळ कळविली आहे.

बुधवारी सकाळी ९ ला त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर राहुल गांधी थेट गंगापूर धरणालगतच्या एमटीडीसी रिसॉर्ट येथे जाणार आहेत. येथे ते शिबीराला संबोधीत करतील. याच दरम्यान ते आंदोलनस्तळी जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विविध ठिकाणी ते भेट देणार असल्याने त्या ठिकाणी अंतिम तयारी केली जात आहे.

विद्यार्थ्यांचा आज मोर्चा

आदिवासी आंदोलकांनी मंगळवारी आयुक्तालयावर मोर्चा आयोजित केला आहे. या राज्यव्यापी मोर्चात राज्यातील विविध भागांतून बांधव, विद्यार्थी व युवक सहभागी होणार आहे. या मोर्चाची आंदोलकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. आंदोलकांनी आयुक्तालयासमोरच स्टेज उभारून त्यांचे स्वागत करण्याची तयारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT