Mobile Attention span pudhari news network
नाशिक

पुढारी विशेष! मोबाईलमुळे सर्जनशीलता, कल्पकतेचा होतोय ऱ्हास

Mobile Attention span : चिंताजनक! मोबाइल 'अटेन्शन स्पॅन' शून्याकडे

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : निल कुलकर्णी

स्मार्ट सेलफोनमुळे मुलांमध्ये 'अटेंन्शन स्पॅन' गंभीररीत्या कमी झाला असून, त्याचा परिणाम सर्वच ठिकाणी मनाची एकाग्रता कमी होण्यावर झाला आहे. फोन वापराने मुलांमधील सर्जनशीलता, अभिनवता आणि कल्पनाशक्ती हरवत आहे. यासह शारीरिक, मानसिक व्याधीही जडत आहेत. शाळेमध्ये वर्गात मोबाइलवर बंदी घातली जात असून, घरीही पालकही मुलांसाठी 'नो मोबाइल' अशी कठोर भूमिका घेत आहेत. माेबाइलच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी आयोजित 'रिहॅबिलटेशन' वर्गात मुलांना पाठवणाऱ्यांच्याही संख्या लक्षणीय वाढल्याचे वास्तव अंतर्मुख करणारे आहे. (Smart cellphones have led to loss of concentration in children.)

  • 'नो मोबाइल' चळवळ : डोळ्याचा आजारांचा (मायोपिया) धोका वाढला

  • चिडचिडेपणा, आक्रमकता, हिंसक वृत्तीत वाढ

  • मोबाइल व्यसनांपासून दूर करणाऱ्या 'व्यसनमुक्ती केंद्रात वाढ

  • अतिवेगवान गाडी चालवण्याचे मूळ मोबाइल गेमिंगमध्ये

  • भावनिक बुद्ध्यांक होत आहे कमी

युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) गेल्या वर्षी जगभरातील शाळांमधील वर्गात सेलफोनवर बंदी घालण्याचे आवाहन केले हाेते. 'यूएन'ने एका संशोधनाचा संदर्भ देत सांगितले की, मुलांमध्ये वाढत जाणारा सेलफोनचा वापर त्यांची मनस्थिती विचलित करण्यासह, शैक्षणिक कामगिरीवर प्रचंड प्रभाव टाकत आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. देशात अन‌् महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि आर्थिक समृद्ध प्रदेशात मोबाइल वापरामुळे मुलांंच्या भावविश्वावर प्रचंड परिणाम झाला आहे. डोळ्यांचा 'मायोपिया' अतिआक्रमक, हिंसक स्वभाव, वेगवान गाडी चालवण्याची अनिवार इच्छा असे दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यास सांगतो. त्यामुळे शाळांमधील वर्गात सेलफोन वापरण्याची बंदी सर्वत्र होत असताना घरीही पालक आपल्या पाल्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवताना दिसत आहेत. इतकेच नव्हे पुण्यातील 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्राने काही वर्षांपूर्वी मुलांना मोबाइल व्यसनांपासून दूर करण्यासाठी घेतलेले शिबिर, पुनर्वसन चळवळ राज्यातील महानगरांसह अनेक शहरांत जोर धरत आहे.

मोबाइलच्या व्यसनांमुळे मुलांमधील अवधान कालावधी (अटेंन्शन स्पॅन) सव्वाआठ टक्के इतका कमी झाला, जो माशांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे अभ्यासासह कुठल्याच गोष्टींवर मुले लक्ष केंद्रित करुरू शकत नाहीत. फोनमुळे चिडचिडेपण, हिंसकता, आक्रमकताही वाढते. मोबाइलपेक्षा काही काळ मुलांना टीव्ही बघू द्यावा पण स्मार्ट सेलफोन १६ वर्षांनंतरच द्यावा.
सचिन जोशी, लेखक तथा शिक्षण अभ्यासक, नाशिक

या देशात शाळांमध्ये मोबाइल बंदी

फ्रान्स, इटली, हंगेरी, चीन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, स्पेन प्रदेशानुसार बंदी, स्पेन, नेदरलॅण्ड, बेल्जियम, फिनलंड व आयर्लंडसह इतर देश बंदी घालण्याच्या विचारात.

मोबाइलने मुलांचे विचार, बुद्धी पांगळी होते. ते इंटरनेटवर शोधायला जातात एक अन‌् दुसरीकडेच भरकटत (सरेंडीपीटी) जातात. त्यात धोके आहेत. नेटची ३२ टक्के माहिती चुकीची असते. मुलांमध्ये समज नसल्याने विवेकशून्य वर्तनाचा धोका वाढतो. पालकांच्या मार्गदर्शनात मर्यादित स्वरूपात फोनचा वापर व्हावा तोही १६ वर्षांनंतर.!
डॉ. चंदक्रांत संकलेचा, समाज अभ्यासक, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT