nashik news  
नाशिक

Pudhari Sahakar Mahaparishad | नाशिकमध्ये आज 'सहकार महापरिषदे'चा जागर! 'पुढारी' समूहातर्फे सहकारातील आव्हानांवर होणार मंथन

Pudhari Sahakar Mahaparishad | सहकार आयुक्त दीपक तावरे यांची उपस्थिती ; 'सहकारातील आव्हाने आणि संधीं' वर जागर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सहकार क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी 'पुढारी' माध्यम समूहातर्फे शनिवारी (दि.१८) नाशिकमध्ये सहकार महापरिषदेचे भव्य आयोजन केले आहे.

राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी दिग्गज मान्यवर मार्गदर्शन करणार असून, सहकारातील आव्हानांवर ऊहापोह होणार आहे. पुढारी' माध्यम समूहातर्फे नेहमीच शैक्षणिक, कृषी, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबवले जातात.

याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या एकदिवसीय महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महापरिषदेचे यंदाचे दुसरे वर्षे आहे. महापरिषदेसाठी जिल्ह्यातील तब्बल ४० हून अधिक पतसंस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या या महापरिषदेला नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा सहकार बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन सुभाष मोहिते, रेणुकामाता को-ऑप. मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव, कोल्हापूरचे माजी सहनिबंधक डी. ए. चौघुले, ज्ञानदीप को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष जिजाबा पवार, रिसील डॉट इनचे संचालक सुधीर पठाडे, नम्रता अॅडव्हर्टाझिंगचे संचालक मच्छिंद्र देशमुख, नाशिक विभागाचे सहनिबंधक संभाजी निकम, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT