Pudhari Sahakar Mahaparishad pudhari photo
नाशिक

Pudhari Sahakar Mahaparishad|सहकार परिषदेतून मिळालेली माहिती ऊर्जा देणारी

सहकार क्षेत्रातील सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केलेल्या उत्स्फूर्त भावना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सहकार क्षेत्रातील प्रश्न व समस्यांवर मंथन घडवून आणत त्यावर उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते, सहकार परिषद सहकारी बँका व पतसंस्थांना दिशादर्शक ठरतात. प्रगतीच्या वाटा सापडतात. त्यासाठी 'पुढारी' ने घेतलेला पुढाकार ही सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत दैनिक 'पुढारी' आयोजित सहकार महापरिषदेसाठी उपस्थित असलेल्या सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

सहकार परिषदेतून मार्गदर्शन मिळालेच. सध्याचा समस्यांवर तोडगा निमण्यासाठी मार्गदर्शन मिळाले, नवीन धोरगांवर चर्चा होऊन माहिती मिळाली. सरकारने राज्य आयुक्त उपस्थित राहिल्यामुळे त्यांचासमोर सहकाराबाबतचे विविध प्रान मांडण्याची व त्यांचे निरसन झाल्याचे समाधान आहे. ही संगी पुहारी ने उपलब्ध करून दिली.

- नारायण बाजे, चेअरमन, श्रीमंत बोरले बाजीराव नागरी पतसंस्था डुबेर ता. सिन्नर

अशा उपक्रमांमधून सहकारमधील नवीन डामोडी व नियमांची माहिती मिळाली किनेकावल केले, त्याची माहिती मिळाली. हा उखाम स्तुत्य आहे. ही दरवर्षी राबवरण केला पाहिजे.

-प्रवीण गोसावी, व्ययाथापक, सलगुंगी महिला नागरी सह. पतस्था, कळवण

सहकार परिषद सातत्याने व्यावी, असे मला वाटते. शासन-प्रशासन आणि सहकार यांच्यातील घडामोडी व बदल कळाले. त्यानुसार पासंस्थाचालकांना बदल करता वेवील. यातून सहकाराचे पुनरुज्जीयन होण्यास मदत होणार आहे. सहकारलाही चालना मिळेल

- मधुकर कोकाटे, व्यापक लोकनेते संवगाव बाळाजी बाजे ग्रामीण किती सह. पतसंस्था, डुबेरे

दैनिक पुढारी ने पहिल्यापासून सेलरी सहकार क्षेत्राला महत्व दिले आहे. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेले सहकार परिषदेचे सहकार क्षेत्राला ऊर्जा देण्याचे काम कौतुकास्पद आहे. बदलत्या काळानुसार सहकार क्षेशतील होणारे बदल परिषदेच्या माध्यमातून कळाले, फासंस्थांडील आने त्यावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. काम करण्यासाठी नवीन संधीची डार्जा या सरकार परिषदेतून मिळाली

- प्रदीप आहेर, व्यवस्थापक, विनिता ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्था, बहाश्रीभोई

अशा परिषदांमुळे सहकार सक्षम होईल. माहितीही अपडेट झाली फाससंस्थाबील आव्हाने पेलतागा तन्ज्ञांचे मार्गदर्शन नक्कीच दिशादर्शक होल त्यामुळे दरवर्षी सहकार परिषद घ्यावी, असे मला वाटते.

- युनूस शेख, आझाद नागनी सह. पतसंस्था, सिन्नर

पतसंस्थांसाठी वर्षातून एकदा तरी अशी परिषद होणे आवश्यक आहे. यात विचारांची देवाण-घेवाण होते. त्यातून एकमेकांना पूरक व मार्गदर्शक मुद्दे मिळतात. सहकारात अनेक प्रश्न आहेत. ते सुटण्यास मदत होते. दैनंदिन कामात सुसूत्रता आणण्यासाठी मदत होईल.

- प्रमोद भदाणे, जनरल मॅनेजर, सुवर्णा नागरी सह पतसंस्था, नाशिक

सहकार क्षेत्रात काय बदल होतोय, कोणते नियम लागू झाले, त्याची अंमलबाजवणी कशी करावी, यांसारखे अनेक प्रश्न पतसंस्थांपुढे असतात. त्यावर मार्गदर्शन मिळाले. प्रश्न सोडवण्यासाठी सहकार परिषद पूरक ठरेल.

-निवृत्ती भागवत, सीईओ, श्री देवनदी खोरे ग्रा. बिगर शेती सह. पतसंस्था सोनांबे, ता. सिन्नर

'पुढारी'ने आयोजित केलेला हा उपक्रम पतसंस्था चालकांसाठी चांगला आहे. आम्हाला या परिषदेत सहभागी होता आले. त्यातून मिळालेले मार्गदर्शन पतसंस्थेच्या विकासासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

-संजय सोनार, व्यवस्थापक, सप्तशृंगी पतसंस्था, वणी, ता. दिंडोरी

सहकार परिषदेतील वक्ते चांगले होते. सहकार क्षेत्रातील जाणकार वक्ते असले, तर त्यांचे मार्गदर्शन प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरते. सहकार विभागाची आवश्यक माहिती मिळाली, ती आम्हाला पतसंस्थेचे कामकाज करताना नक्कीच ऊर्जा देणारी ठरेल.

- संजय चित्ते, व्यवस्थापक, जगदंबा पतसंस्था, वणी, ता. दिंडोरी

सहकार परिषद ही सहकाराला नवीन दिशा देणारी ठरली. चांगला उपक्रम 'पुढारी'ने घेतला. सहकार विभागात प्रत्यक्ष यशस्वीरीत्या काम करणाऱ्या तज् मार्गदर्शन मिळाले. ते आमच्या कामात बदल घडवण्यास ऊर्जादायक ठरेल.

-दीपक व्यवहारे, चेअरमन, व्यंकटेश नागरी पतसंस्था, चांदवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT