नाशिक : नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा मानदंड असलेल्या दै. 'पुढारी' आयोजित 'पुढारी गाैरव- २०२५' सोहळा शनिवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजता इंदिरानगर येथील हॉटेल सयाजी पॅलेस येथे रंगणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना 'पुढारी गौरव- २०२५' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यातील अग्रणी दै. 'पुढारी' नेहमीच अभिनव आणि समाजाभिमुख उपक्रम राबवित असते. याच शृंखलेत समाजासाठी, नि:स्पृहपणे काम करणाऱ्यांचा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 'पुढारी गौरव-२०२५' या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा या सोहळ्यासाठी प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ पद्श्रमी डॉ. तात्याराव लहाने, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित राहणार आहेत. समाजकारण, राजकारण, शिक्षण, आरोग्य, ललित कला, उपक्रमशील शाळा यांसह विविध क्षेत्रांत आपल्या अतुलनीय कार्यातून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या ४७ पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते गाैरवण्यात येणार आहे. हा सोहळा केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
१) डॉ. मिलिंद ढोबळे, २) सचिन जोशी ३) सूरजितसिंग मनचंदानी, ४) अतुल मते, ५) प्रा. विनोद राठोड, ६) डॉ. पराग पटणी, ७) शिवानी विलास देसले, ८) योगेश मालपाणी, ९) संजय खताळे, १०) संतोष फटांगळे, ११) निवृत्ती इंगोले, १२) डॉ. गोविंद झा, १३) योगेश पाटील, १४) गणेश मोरे, १५) रुचिर पंचाक्षरी, १६) महेंद्र पगारे, १७) डॉ. सुरेश कांबळे, १८) ॲड. दत्तात्रय चव्हाण, १९) प्रमिला मैंद, २०) चंदन घुले, २) डॉ. उमेश मराठे, २२) संतोष भिसे, २३) दीपक बरखे, २४) दिलीप शेळके, २५) बाळकृष्ण शिरसाठ २६) डॉ. प्रकाश पाटील, २७) डॉ. मनीषा खैरनार- बागूल २८) नितीन कांबळे, २९) कल्पेश कांडेकर, ३०) संदीप तांबे, ३१) इंदुमती नागरे, ३२) तानाजी भोर, ३३) दीपक बलकवडे, ३४) ज्ञानेश्वर गायकवाड, ३५) पल्लवी पाटील ३६) बाळासाहेब घडवजे, ३७) रंगनाथ जाधव, ३८) बाळासाहेब गायकवाड, ३९) संदीप वाजे, ४०) सतीश धात्रक, ४१) राकेश थोरात, ४२) संतोष कचरे, ४३) अनिल खोत, ४४) डॉ. विलास सुशीलाबाई-दामोधर चांडोले, ४५) स्नेहल आव्हाड, ४६) एकनाथ पवार, ४७) वैभव कुलकर्णी.