Railway Protest Goa 
नाशिक

Railway Protest Goa | वेळसावात रेल्वेच्या अतिक्रमाणाविरोधात स्थानिकांचा आक्रोश; आमदार विजय सरदेसाई आणि अमित पाटकर आंदोलनात!

Railway Protest Goa | 'रेल्वेने खाजगी जमिनीवर माती टाकली'; वेळसावात जेसीबीने रस्ता सपाट करताना तणाव

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वेळसाव येथे रेल्वे प्रशासनाने खाजगी जमिनीवर टाकलेली माती हटवून स्थानिकांच्या घरांकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पाठिंबा दिला. दोन्ही नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन रेल्वेने टाकलेली माती हटवून स्थानिकांचा पारंपारिक रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली.

कुठ्ठाळी-वेळसाव परिसरात सुरू असलेल्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सुमारे २० घरांकडे जाणारा प्रवेशमार्ग बंद होण्याची शक्यता असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रस्तावित कामांमुळे त्यांचा पारंपारिक मार्ग बंद होऊन बाधित कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
रेल्वेने रहिवाशांची संमती न घेता खाजगी मालमत्तेवर कथितरीत्या माती टाकल्याचा आरोपही स्थानिकांनी केला. त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू करून संबंधित कामांबाबत तीव्र विरोध दर्शविला. सुरू असलेल्या दुसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामांच्या कायदेशीरतेवरही स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आपल्या समस्या ऐकून घेऊन योग्य तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

आंदोलनावेळी विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक उपस्थित होते. स्थानिकांना त्यांच्या पारंपारिक मार्गाचा वापर करता यावा, यासाठी अमित पाटकर यांच्या मालकीच्या जेसीबीच्या साहाय्याने चिखलाने भरलेला रस्ता सपाट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शांततापूर्ण आंदोलनाला काही काळ तणावपूर्ण वळण लागले.


स्थानिकांच्या जमिनीचा आणि त्यांच्या ये-जा करण्याच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे, अशी भूमिका अमित पाटकर आणि विजय सरदेसाई यांनी घेतली. स्थानिकांच्या घरांकडे जाणारा पारंपारिक मार्ग तातडीने खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर स्थानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT