नाशिक : प्रदीर्घ सेवा कालावधीत गुन्ह्यांची उकल, उत्कृष्ट तपास, कायदा व सुव्यवस्था, सणउत्सव बंदोबस्त, व्हीआयपी बंदोबस्त आदी कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या पोलिस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना २६ जानेवारी २०२३ मध्ये राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. तसेच त्यांना २०१७ मध्ये पोलिस महासंचालक यांचेही पोलिस पदक प्राप्त झाले होते. मंगळवारी (दि.२९) त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले.