President Droupadi Murmu 
नाशिक

President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात आणि शंखनादात सिंहस्थ महाकुंभाचा दिमाखदार प्रारंभ

President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदातीरीवरील रामकुंड परिसरात श्री गंगा - गोदावरी पंचकोठी तीर्थ पुरोहित संघ आणि बहुवृंदांच्या वैदिक मंत्रांच्या मंगळघोषात गोदामाईच्या साक्षिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशत फडफडली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रार्थना ऐतिहासिक शंखनाद झाला.

नाशिकनाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ पर्वाचा औपचारिक शंखनाद शनिवारी (दि. ३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. वेदमंत्रांचा गजर, शंखनाद, यज्ञविधी आणि गीतमी-गोदावरीच्या पूजाने गोदाकाठावर सिंहस्थ पर्वाची मंगलमय नांदी झाली.

तत्पूर्वी राष्ट्रपतींनी सकाळी ओझर विमानतळाहात आगमन झाल्यानंतर त्या वाहनाने रामतीर्थ परिसरात दाखल झाल्या. यावेळी रामतीर्थावर वैदिक विधिना प्रांम झाला. यात देवता पंचोपचार पूजननंतर राष्ट्रपतींनी यज्ञात समिधा अर्पण करत विश्वकल्याण, सुख-समृद्धी आणि सुयोग्य पर्जन्यवृष्टीचा संकल्प केला. मंत्रपुष्पांजलिंसह गोदामातेचे पूजन करण्यात आले.

पवित्रहस्ता सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल व श्री गंगा-गोदावरी पंचकोठी तीर्थ पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केले. दुपारी १२.०२ वाजता अभिजित मुहूर्तावर सूर्य सिंह पर्वेत प्रवेश करतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करत नाशिक -त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभाच्या पर्वाला प्रारंभ करण्यात आला. विश्वकल्याण नौंदिविणाच्या वादकांनी शंखनाद केला. रामतीर्थावर धर्मध्वजारोहण होताच उपस्थितीनी 'जय श्री राम' असा जयघोष केला. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते गोदावरीची आरती करण्यात आली. पुरोहित संघातर्फे राष्ट्रपतींना स्मृतिचिन्ह सुनावले.

ध्वज फडकताच शंखनाद

समितीर्वर उपस्थित प्रत्येकाच्या अंतःकरणात सिंहस्थाच्या स्वागताची दशदिशांत घुमला. उपस्थित भाविकांनी 'जय श्री राम', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'भारत माता की जय' असा जयघोष केला. त्या क्षणी जणू गोदातीरीवरील प्राचीन श्रद्धेला नव्या युगातील सिंहस्थाच्या स्वागताचे पवित्र अधिष्ठान लाभल्याचे चित्र दिसून आले.

गोदावरीच्या धार्मिक महात्म्याचे विश्वण असलेले विशेष तापत्र देऊन सम्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र पवार, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नहरी झिरवळ, मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितीन राणे,

महामेर विभागीय आकडे-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भारे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सुहास कांदे, गोकुळ गितें, राहुल ढिकळे, देवयानी फरंदे, सीमा हिरे, सरोज आहिर, दिलीप बनकर, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेदाम, कुंभमेळा प्राधिकृत आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा आयुक्त मनीषा खत्री, प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुध प्रसाद उपस्थित होते.

असा आहे सिंहस्थ कुंभ धर्मध्वज

सिंहस्थ धर्मध्वजावर श्री गंगा-गोदावरी धर्मध्वज शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ देण्यात आला आहे. त्यावरतील अमृतकुंभ अमरत्व, मनाती आणि देवी शक्ती यांचे प्रतीक आहे. श्री हे अक्षर संशक्तीचे, तर १ घंटा व ३ घुंगरू नादाचे आणि बहनानादाचे प्रतीक मानले आहे. दुसऱ्या बाजूला गोदावरीचे वाहन असलेले मगर आणि सूर्य-चंद्राची शुभचिन्हे आहेत.

सोहळ्यास साधु-महंतांची मांदियाळी

धर्मध्वजारोहण सोहळ्याला जगद्गुरु श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज, श्री महंत ज्ञानदास महाराज, माधवाचार्य महाराज, अखिल भारतीय आखाड्या परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी महाराज, श्री पंच निर्मोही अस्री आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, महंत संजयदास महाराज, श्री महंत मोहनदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, दिगंबर अग्नी आखाड्याचे श्री महंत माधवदास महाराज, श्री आदि महंत रामनेहमी महाराज यांच्यासह साधू-संत व भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

श्रद्धेच्या महाप्रर्वास प्रारंभ

भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावाने भारावलेल वातावरण... जणू आध्यात्मिक परंपरेने रामतीर्थावर पुण्हा एकदा सजीव रूप धारण केले. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या श्रद्धेच्या महाप्रर्वाची चाहुल देणारा हा सोहळा नाशिकच्या इतिहासातील एक अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.

सिंहस्थ महाकुंभ पर्वाचे प्रमुख टप्पे

  • ३१ ऑक्टोबर २०२६ - रामकुंड (नाशिक) व कुशावर्त (त्र्यंबकेश्वर) येथे धर्मध्वजारोहण

  • २४ जुलै २०२७ - साधुग्राम येथे धर्मध्वजारोहण

  • २९ जुलै २०२७ - नाशिकमध्ये नगरप्रदक्षिणा

  • २ ऑगस्ट २०२७ - पहिले अमृतस्नान

  • ३१ ऑगस्ट २०२७ - दुसरे अमृतस्नान

  • श्रावण अमावस्या - नाशिक व त्र्यंबकेश्वर

  • ११ सप्टेंबर २०२७ - तिसरे अमृतस्नान (नाशिक)

  • १२ सप्टेंबर २०२७ - तिसरे अमृतस्नान (त्र्यंबकेश्वर)

  • २४ जुलै २०२८ - पर्वाची सांगता

भूक, तहान विसरून भाविक भक्तीत तल्लीन

धर्मध्वजारोहणाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी भाविक भूक, तहान विसरून भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच भाविक गोदाघाटावर बसले होते. रामनामाचा जप करीत, सोहळ्याचा प्रत्येक क्षण अनुभवत होते. प्रशासनाने याठिकाणी किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला हवी होती, अशी उपेक्षाही भाविकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली. लगबग सकाळपासूनच सुरू होती. ज्यांना प्रत्यक्ष सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले नाही, अशा भाविकांसाठी जागोजागी मोठ्या 'स्क्रीन'ची व्यवस्था केली होती.

या पहाड्यावरून धर्मध्वजारोहणचे थेट दृश्य पाहतानाही भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाट आणि जयघोष करीत सोहळ्याचा आनंद घेतला. गोदावरीच्या काठावर उमटणारा मंत्रोच्चारांचा निनाद, भाविकांचा जयघोष, धर्मध्वजाचे दर्शन आणि राष्ट्रपतींची उपस्थिती अशा मंगलमय वातावरणात नाशिकच्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पर्वाला आध्यात्मिक वातावरण प्रारंभ झाला. गोदातीरी जमलेला हा भक्तीचा जनसागर आणि धर्मध्वजारोहणाचा ऐतिहासिक क्षण भाविकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT