सिडको (नाशिक) : सिडको प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडको भागात बडदेनगर ते सुंदरबन कॉलनीदरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
रस्त्यावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहने चालविताना अपघात होत असल्याची बातमी दैनिक 'पुढारी'त प्रसिद्ध होताच मनपाच्या सिडको बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. मनपाच्या या कृतीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडको भागातून बडदेनगर ते सुंदरबन कॉलनी रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था पावसाळ्यात अत्यंत खराब झाली आहे. ठाकरे उदयान व भुजबळ फॉर्म चौफुलीवर तसेच अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात दुचाकी घसरून पडत आहे. कारसुध्दा या खड्ड्यात फसत आहेत. रस्त्याच्या दुर्दशेचे वृत्त दै. 'पुढारी'त प्रसिध्द होताच मनपाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. सध्या बडडेनगर ते सुंदरबन कॉलनीपर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काॅंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहतूक केली जात आहे.
बडदेनगर ते सुंदरबन कॉलनीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण २८ दिवसांत पूर्ण झाले असून, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच सुंदरबन कॉलनी ते बडदेनगर या दुसऱ्या बाजूचे काँक्रिटीकरण येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.जगदीश रत्नपारखी, अभियंता, बांधकाम विभाग मनपा, सिडको, नाशिक.