Police Combing Operation : लातूर पोलिसांचे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन  Pudhari
नाशिक

Nashik College Security | वावरे महाविद्यालय परिसरात टवाळखोरांना दंडुक्याचा प्रसाद; पोलिसांच्या गस्तीत वाढ

Nashik College Security | अमित ठाकरेंच्या भेटीनंतर पोलिस विभागाकडून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा
उत्तमनगरात वावरे महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांविरोधात अंबड पोलिसांनी धडक कारवाई केली. महाविद्यालय परिसरात विनाकारण थांबणाऱ्या व विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मनसे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शनिवारी (दि. २२) महाविद्यालायाला भेट दिली होती. त्यावेळी काही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार त्यांच्याकडे मांडली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. महाविद्यालयाच्या सूचनेची गंभीर दखल घेत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिसरात विशेष गस्त वाढवली.

संशयितांची चौकशी

संशयित तरुणांची चौकशी करून काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नूतन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालय परिसरातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी नियमित गस्त, संशयितांवर लक्ष आणि त्वरित कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT