अंबादास बेनुस्कर पिंपळनेर
पुढारी वृत्तसेवा: पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आज (दि.९) दहा प्रभागासाठी 20 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. तत्पूर्वीच पिंपळनेरच्या नगराध्यक्ष पदाचा बहुमान अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिलेला घोषित झाला आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया आणखी गतिमान होणार आहे.
पिंपळनेर येथील नगरपरिषदेच्या सभागृहात आज सकाळी आरक्षण सोडतीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, मुख्य अधिकारी दीपक पाटील, सहाय्यक नगररचनाकार अनिता भोये, नगर अभियंता तेजस लाडे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.
प्रभाग 1 मधील वार्ड अ-अनुसूचित जमाती महिला, ब- सर्वसाधारण.प्रभाग 2 मधील वार्ड अ -अनुसूचित जमाती,ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 मधील वार्ड अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब - सर्वसाधारण महिला. प्रभात 4 मधील वार्ड अ - अनुसूचित जमाती, ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 मधील वार्ड अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब - सर्वसाधारण. प्रभाग6 मधील वार्ड अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब - सर्वसाधारण. प्रभाग 7 मधील वार्ड अ - अनुसूचित जमाती महिला, ब - सर्वसाधारण, प्रभाग 8 मधील वार्ड अ - अनुसूचित जाती महिला, ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण,प्रभाग 9 मधील वार्ड अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब - सर्वसाधारण, प्रभाग 10 मधील वार्ड अ -अनुसूचित जमाती महिला,ब - सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी शकील शेख, कुसुम पवार, वैभव जुवेरी, भूषण महाजन, गुणवंत पाटील या कर्मचाऱ्यांनी आरक्षण सोडत कामाला मदत केली. याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आरक्षण सोडत शांततेत व्हावी यासाठी पिंपळनेरचे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.