महिलेची रस्त्यावरच प्रसुती
पिंपळगावला महिलेची रस्त्यावरच प्रसुती file photo
नाशिक

All is Well | पिंपळगावला महिलेची रस्त्यावरच प्रसुती; जुळया बाळांना दिला जन्म

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : शहरात भर रस्‍त्यावरच महिलेची प्रसुती झाल्याचा प्रकार घडला. मात्र, प्रसुतीतज्ज्ञांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे गुंतागुतीच्या प्रसुतीत जुळ्या बाळांसह माता सुखरूप आहे.

महिलेची रस्त्यावर होणाऱ्या प्रसुतीचा क्षण अंगावर शहारे आणणारा ठरला. पिंपळगाव बसवंत येथे गरोदर मातेच्या प्रसुतीदरम्यान तिने गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पिंपळगावच्या प्रसुतीतज्ज्ञ डॉ. गौरी विधाते यांच्या समयसुचकतेमुळे गुंतागुंतीच्या प्रसुतीत बाळ अन् माता सुखरूप आहेत.

जालीम सैय्यद (रा. उंबरखेड रोड) हे पत्नी नगीनासह राहतात. नगीना या गरोदर होत्या. नऊ महिन्याच्या कालावधी उलटल्याने प्रसुतीचा कालावधी जवळ आला. अपेक्षीत प्रसुतीच्या काही दिवस अगोदर त्यांना गेल्या आठवड्यात प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे सैय्यद यांनी रिक्षाने तत्काळ दवाखान्यात घेऊन जात होते. मात्र, रस्त्यातच बाळाचे डोके बाहेर व शरीर मातेच्या पोटात अशी गुंतागुंती स्थिती उदभवली. त्यामुळे आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ही माहिती प्रसुतीतज्ज्ञ डॉ. गौरी विधाते यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता त्यांनी रस्त्यावरच नगीनाची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. अखेर डॉ. विधाते यांनी सुखरूप प्रसुती करत जुळ्या बाळांसह मातेचे प्राण वाचविले आहे. यावेळी सैय्यद दाम्पत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

नगीना सैय्यद यांची प्रसुती अत्यंत गुंतागुतीची होती. त्यात माता किवा बाळाच्या जीवाला धोकाही होता. कठीण परिस्थितीत आई व बाळाचे प्राण वाचवुन सुखरूप प्रसुती करता आली याचे आत्मीक समाधान आहे. गरोदरपणात योग्य काळजी घेण्याची आवश्‍यकता असते. अन्यथा असे प्रसंग उद्भवतात.
डॉ. गौरी विधाते, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, नाशिक.
SCROLL FOR NEXT