Nashik Pudhari News 
नाशिक

Nashik Pudhari News | फिजिओथेरपीमुळे हृदयविकार अन् पक्षाघाताचा धोका होतो कमी; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यशाळा

Nashik Pudhari News | आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक फिजिओथेरपीदिनी कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 'हृदयविकार, पक्षाघात' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. स्वाती जाधव आदी उपस्थित होते.

कुलसचिव डॉ. बंगाळ यांनी संगणकीय युगातील बसून काम करण्याची जीवनशैली (बैठी जीवनशैली), चुकीचा आहार व शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकार व पक्षाघाताचा धोका वाढत असल्याचे सांगितले.

प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. डॉ. संदीप कडू यांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि फिजिओथेरपी या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. डॉ. सागर महाजन यांनी पक्षाघात टाळण्यासाठी दररोज किमान एक तास शारीरिक हालचाल आवश्यक असल्याचे सांगत चालणे, योग, पायऱ्या चढणे व पोहणे यांचा दिनचर्येत समावेश करण्याचा सल्ला दिला.
डॉ. शृंखला कौशिक यांनी हृदयविकार व पक्षाघातानंतर कार्डियाक आणि न्यूरो फिजिओथेरपी पुनर्वसन महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगितले. या कार्यशाळेला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT