flight service pudhari photo
नाशिक

Nashik To New Delhi Flight | नाशिककरांसाठी खूशखबर! ओझर ते नवी दिल्ली थेट विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू

Nashik To New Delhi Flight | ओझर (नाशिक) विमानतळावरून नवी दिल्लीसाठी सकाळची थेट विमानसेवा १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा

ओझर (नाशिक) विमानतळावरून नवी दिल्लीसाठी सकाळची थेट विमानसेवा १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. खा. भगरे यांनी २८ सप्टेंबर रोजी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना दिलेल्या निवेदनात नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती.

विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, इंडिगोचे 6E2312 हे विमान दररोज सकाळी ९ वाजता ओझर (नाशिक) येथून नवी दिल्लीसाठी रवाना होऊन सकाळी १०.५० वाजता दिल्ली येथे पोहोचणार आहे.

तसेच 6E6311 हे विमान दिल्लीहून सकाळी ६.४० वाजता रवाना होऊन सकाळी ८.३० वाजता नाशिक विमानतळावर पोहोचणार आहे. हे सुधारित वेळापत्रक १ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहे.

सकाळची थेट नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे नाशिक जिल्ह्याची राजधानी दिल्लीशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः द्राक्ष, कांदा व इतर कृषी उत्पादनांच्या व्यापारासह उद्योग, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि शासकीय कामकाजासाठी दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

"नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली मागणी आणि त्यानंतरचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे आभार," असे खा. भास्करराव भगरे यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT