Tribal Hostel Inspection 
नाशिक

OBC Hostel Admission | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! वसतिगृह आणि स्वाधार योजनेच्या अर्जासाठी अखेर मुदतवाढ जाहीर

OBC Hostel Admission | ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जातीमधील विद्यार्थ्यांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वाधार योजना या अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

त्यामुळे प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालकांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यापूर्वी नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत दिली होती.

आता ही मुदत वाढवून २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वाधार योजना यांचा लाभ घेण्यासाठी व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

यापूर्वी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून २३ नोव्हेंबरपर्यंत पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, ऑनलाइन अर्ज भरणे तसेच संबंधित माहिती सादर करण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

या पार्श्वभूमीवर विभागाने अर्ज सादर करण्यासाठी अतिरिक्त दोन दिवसांची संधी उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयामुळे प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदत अपुरी पडलेल्या विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवस मिळणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT