सिडको (नाशिक): युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता जवानांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगरतर्फे सिडको परिसरात रक्तदान शिबिर घेऊन शंभर पिशव्या रक्त संकलित करण्यात आले,अशी माहिती आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.
सामाजिक कार्यात वंचित बहुजन आघाडी नेहमीच अग्रेसर असते.कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबवून आघाडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.आता पाकिस्तानला मुंहतोड जवा म्हणून भारताचे सैनिक सीमेवर आपली जीवाची बाजी लावत आहेत.त्यांच्यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिरे घेऊन रक्त संकलित करण्याच्या सूचना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिल्या.त्या आदेशाचे पालन करून आम्ही रक्तदान शिबिरे घेऊन मोठ्या प्रमाणात रक्त पिशव्या सैन्य दलासाठी पाठवणार आहोत,असे अविनाश शिंदे यांनी सांगितले.
शनिवारी (दि.10) सिडकोत झालेल्या रक्तदान शिबिराद्वारे 100 पिशव्या रक्त संकलित झाले.येत्या काही दिवसात विविध विभागात अशी शिबिरे घेऊन सैनिकांच्या हिताची काळजी घेतली जाणार असल्याचे शिंदे यांनी पुढे नमूद केले. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदानासारख्या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवावा .अविनाश शिंदे, महानगर प्रमुख, नाशिक.