जगभरात ८ कोटी लोक व्यसनाधीन file
नाशिक

देशातील युवावर्गाला ऑनलाइन जुगाराचा विळखा, काय आहे गँबलिंग डिसऑर्डर?

Gambling Disorder | जगभरात ८ कोटी लोक व्यसनाधीन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निल कुलकर्णी

कष्ट न करता पैसा मिळवण्याची मानसिकता, भौतिक सुखाची अनिवार ओढ यामुळे ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण देशासह राज्यातही प्रचंड वाढले आहे. यात १६ ते ४० वयोगटातील तरुणाईसह अनेक जण यामध्ये गुंतले असून, त्यातून 'गॅंबलिंग डिसऑर्डर्स' या आजारासह इतरही विकृतीत वाढ झाल्याचे निरीक्षण समाजअभ्याकांनी नोंदवले आहे.

* स्पोर्ट्स सट्टेबाजीमुळे १८ टक्के किशोरवयीनांना विविध 'डिसऑर्डर्स'

* जगभरातील ४४.८७ लोक पत्करतात ऑनलाइन जुगार जोखीम

* तरुणाईला विनाकष्ट हवी श्रीमंती; मात्र जुगारातूनच अधिक बरबादी

* जुगार - अमली पदार्थ - हिंसा हे दुष्टचक्र पोखरते राष्ट्राच्या युवा संपत्तीला

* जुगाराच्या जाहिरांतीवर कडक निर्बंधांची मागणी

डिजिटल क्रांती ऑनलाइन व्यवहाराने मनुष्याचे जगणे सुसह्य, कष्टविरहित आणि आनंदी केले. मात्र जुगारींनाही 'ऑनलाइन'चा पर्याय उपलब्ध झाल्याने अन‌् त्याच्या विळख्यात युवावर्ग अडकला आहे. लॅन्सेल्ट हेल्थ कमिशनच्या ताज्या अहवालानुसार जगभरातील ४४.८७ टक्के लोक ऑनलाइन जुगाराची जोखीम उचलतात. या आकडेवारीत सर्वाधिक तरुण वर्ग गुंतल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे. ही आकडेवारी जागतिक असली, तरी भारतात आणि विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी डिजिटल क्रांती वेगाने झालेल्या राज्यांत यांचे सर्वाधिक व्यसनी असल्याचे चित्र आहे. क्रिकेट, हॉकी आदी खेळांचे आकर्षण असलेला युवा वर्गात 'स्पोर्ट्स सट्टेबाजी'चे प्रमाण प्रचंड वाढल्याचे निष्कर्ष सांगतात. १६.३ ते २० टक्के किशोरवयीन विविध प्रकाराचे 'डिसऑर्डर्स' आजारांना बळी पडली आहेत. टेक्नोसॅव्ही तरुणाईला आज ऑनलाइन जुगारी, फॅंटसी स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स बेटिंगचा विळखा इतका प्रचंड आवळला गेला आहे की, महानगरातच नव्हे, तर खेडोपाडीही अशा प्रकारांत वाढ झाल्याचे वास्तव चिंताजनक आहे. 'रोलेट' आणि यासारख्या अन्य ऑनलाइन जुगाराने तरुणाईचे भावविश्व उद्ध्वस्त करण्यासह इतरही सामाजिक समस्यांत वाढ झाली आहे.

गँबलिंग डिसऑर्डर काय आहे?

गॅंबलिंग डिसऑडर ही एक अनिवार स्थिती असून, त्यात अडकलेली व्यक्ती जुगार खेळल्यापासून स्वत:वर नियंत्रण ठेवूच शकत नाही. सतत आणि नियमित जुगारात पैसे लावल्याने आणि त्यात क्वचितच जिंकणे आणि जास्त प्रमाणात पैसे हरले जातात. त्यामुळे कर्जवाढ, पैशाची चणचण यामुळे 'डिप्रेशन' निद्रानाश, सतत थकवा जाणवणे, चिंता कायम राहणे, 'ॲन झायटी'सारखे इतर मानसिक आजार बळावतात. त्यातून मनोकायिक (आजारी मनामुळे शरीरावर होणारे) आजारातही वाढ होते. कुटुंब, आपुलकीची माणसे, मित्र दूर जातात. त्यातून एकटेपणाची भावना निर्माण होते. सतत पैसा हरल्याने कर्जबाजारीपणा येतो.

'इझी मनी', 'लक्झरियस लाइफ'चे आकर्षण युवावर्गात प्रचंड आहे. त्यामुळे कष्ट न करता ऑनलाइन जुगाराचेही व्यसनही तरुणाई प्रचंड वाढले आहे. कमीत कमी वेळेत अधिक पैसा मिळवण्याच्या मानसिकेतून हा प्रकार वाढला. व्यक्तीने जुगार जिंकला की, एकदोनदा पैसे मिळतात. त्यातून व्यसन जडते. पण नेहमीच असे होत नाही. हा मानसिक आजार, व्यसनाधीनता समजून मुलांवर उपचार करावेत.
अर्पणा चव्हाण, समुपदेशक, युवा मानसशास्त्रज्ञ, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT