Onion Purchase fraud
कांदा खरेदीत पिंपळनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक file photo
नाशिक

Onion Purchase fraud | कांदा खरेदीत पिंपळनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर, (जि.धुळे) : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील सप्तश्रृंगी ट्रेडींग कंपनी संचालकाकडून 3 लाख 57 हजार 210 रूपये किंमतीचा कांदा खरेदी केल्यावर त्यास नाशिक जिल्ह्यातील येवला येथील दोघांनी केवळ 35 हजार रूपये परत केले. त्यानंतर उर्वरीत पैसे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळनेर येथील सप्तश्रृंगी ट्रेडींग कंपनीचे संचालक हरिदास रामदास शिरसाठ (पाटील) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल शंकर कदम व राहुल शंकर कदम व शंकरशेठ कदम सर्व रा.येवला, जि.नाशिक या तिघांनी विश्वास संपादन करीत 3 लाख 57 हजार 210 रूपये किंमतीचा कांदा खरेदी केला. त्यापैकी ट्रॉला भाडे 85 हजार रूपये मालपोच करताच देण्याची बोली असल्याने मुलगा वनराज शिरसाठ यांच्या बँक खात्यावर दोन टप्प्यात 35 हजार रूपये टाकले. मात्र उर्वरीत 2 लाख 37 हजार 210 रूपये देण्यास आजवर टाळाटाळ केली.

या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात वरील तिघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली असई ए.एस. पवार करीत आहेत.

SCROLL FOR NEXT