Onion Pudhari
नाशिक

Onion Price Hike | कांदा पुन्हा महागणार?; पावसामुळे पुरवठा घटल्याने दर 80 रुपये पार जाण्याची शक्यता!

Onion Price Hike | पावसामुळे आयात मालात घट; 80 रुपये किलोपर्यंतचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पाऊस न पडल्यामुळे पीक येण्यास झालेला विलंब आणि घटलेली आयात यांमुळे पुढील काही दिवस तरी कांद्याच्या दरात घट होण्याऐवजी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
मागील आठवड्यात खुल्या बाजारात ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा कांदा सध्या ७० रुपये दराने विकला जात आहे.

मात्र, मालाचा पुरवठा घटलेला आहे. त्यामुळे दर पुन्हा वाढून ८० रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवर ५७ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री सुरू आहे.

आयात घटल्यामुळे बाजारपेठेतील पुरवठा घटून दरवाढ होण्याची चिन्हे सध्या तरी बाजानातील स्थितीवरून दिसत आहेत. कांद्याच्या दराबाबत बोलताना फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले की, मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे कांदा कुजून गेला.

त्यामुळे दुसरे उत्पादन येईपर्यंत पुढील १५ ते २० दिवस कांद्याची किंमत अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर बेळगाव परिसरातीलही कांदा बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे किमान ५ रुपयांनी तरी दर कमी होईल.

केंद्र सरकारने सुमारे ५ हजार ५०० टन कांदा बाजारात आणला आहे. सध्या महामंडळाच्या स्टॉलवर कांद्याचा दर ५७ रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गणेश चतुर्थीमुळे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. काहींचे दर किंचित वाढले तर काहींचे घटले आहे.

फलोत्पादन महामंडळाच्या स्टॉलवरील इतर भाज्यांचे दर

टोमॅटो : २३ रुपये

  • चिटकी : ५२ रुपये

  • भेंडी : २८ रुपये

  • गाजर : ४७ रुपये

  • कोबी : २५ रुपये

  • बटाटे : २७ रुपये

  • वालपापडी : ५० रुपये

  • हिरवी मिरची : ४७ रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT