कांद्याचे नुकसान Pudhari News Network
नाशिक

Onion News Nashik | अवकाळीने साडेतीन हजार हेक्टरवरील कांदा मोतीमाेल

साडेतीन हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान: शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव/ नाशिक : यंदा मे महिन्यात झालेल्या अवकाळी व गारपटीने कांदा पिकाला मोठा फटका बसला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यात 3 हजार 556 हेक्टरवरील कांदा पीक उद्ध्वस्त झाल्याचा आहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविला आहे.

विशेष म्हणजे सलग सुरू राहिलेल्या पावसामुळे साठविलेला 25 ते 30 टक्के कांदा जागेवरच सडला आहे. नाशिक, अहिल्यानगर अहमदनगर, पुणे या प्रमुख कांदा उत्पादन क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती कांदा विशेष तज्ज्ञ निवृत्ती न्याहारकर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली. सात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील 1480 हेक्टरवरील कांद्याचे झाले आहे.

यंदा शेतकऱ्यांनी कांद्याला पंसती दिली. नाशिक जिल्हयात कांद्याची 2 लाख 90 हजार 136 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. अखेरच्या टप्प्यात पावसामुळे कांदा रोपाचे मोठे नुकसान झाले. मात्र, अवकाळीने काढणी केलेला व काढणीवर आलेल्या कांद्याचे नुकसान झाले. सध्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला ५०० ते २,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असला, तरी सडलेला कांदा आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे.

Nashik Latest News

अवकाळीने कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे 30 टक्के कांदा सडला आहे, तर कांद्याच्या रोपवाटिका नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे सध्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. आगामी काळात उत्पन्नात घट होऊ शकते.
भरत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT