गणेश सुभाष ततार pudhari news network
नाशिक

Nashik | दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार

पुढारी वृत्तसेवा

देवळा ; देवळा - मालेगाव रस्त्यावर पावजी बाबा फाट्यानजिक शनिवारी (दि.६) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर दुसऱ्या एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. या घटने बाबत रात्री उशिरा देवळा पोलिसांत मोटर अपघातचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव कडून कळवणकडे जात असलेल्या एम. एच. ४१ - झेड - ७४११ व कळवण कडून मालेगावकडे जात असलेल्या एम.पी. झेड जे - ८३१३ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात घडला. यामध्ये कळवण येथील रहिवाशी व देवळा व वणी मर्चंट बँकेचे माजी व्यवस्थापक गणेश सुभाष ततार (३६) यांचा जागीच मृत्यू झाला तर समोरील वाहनातील एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. अपघाता नंतर पावजी बाबा मित्र मंडळाच्या व स्थानिक कार्यकर्त्यांना धाव घेत अपघातील जखमींना तात्काळ देवळा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. जखमी प्रवाशी हे मध्ये प्रदेशातील आहे. ते सप्तशृंगी गडावरून देवदर्शन आटोपून परतत होते.

अपघातात मृत झालेले गणेश सुभाष ततार (कळवण ) यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने कळवण देवळा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT