ST Corporation digital pudhari news network
नाशिक

आता एसटी महामंडळही डिजिटल! प्रवाशांची रोखऐवजी ऑनलाइनला पसंती

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : वैभव कातकाडे

राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातील अनेक समस्यांपैकी एक असलेल्या 'चिल्लर'चा प्रश्न नवीन ॲन्ड्रॉईड तिकीट मशिनमुळे निकाली निघू लागला आहे. ऑनलाईन व्यवहारांकडे कल वाढू लागला असून, त्यातून नाशिक आगारामध्ये गेल्या आठ महिन्यांत पाच कोटी १८ लाख ४२ हजार २०५ रुपयांची तिकीटे देण्यात आली आहेत. यात सर्वाधिक व्यवहार हे शहरकेंद्री नाशिक-१ आगारांतर्गत तीन कोटी १४ लाख २९ हजार ८७५ रुपये झाले आहेत. (State Transport Corporation's buses are trending towards online transactions)

बदलत्या काळानुसार लालपरीने देखील कात टाकली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या दर्जावर बसचा चेहरामोहरा बदलत असून, त्यात आता इलेक्ट्रीक बसदेखील धावू लागल्या आहेत. त्यात पारंपरिक असलेली सुट्ट्या पैशांची अडचण ही अँड्रॉईड तिकीट मशिनच्या माध्यमातून निकाली निघाली आहे. रोखऐवजी ऑनलाईन पद्धतीने तिकीटे घेणे साेयीस्कर ठरत असल्याने हा बदल टेक्नोसॅव्ही प्रवाशांकडून चांगलाच स्वीकारला जात आहे. (This change is being well received by techno-savvy passengers as it is convenient to buy tickets online instead of cash.)

राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाव ते शहर जोडणारी लालपरी प्रवाशांना मोठा आधार ठरते. त्यात आता महामंडळ डिजिटल होत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त हाेत आहे.

वाहकांच्या प्रबोधनाची गरज

सुट्टे पैशांची समस्या निकाली काढण्यासाठी महामंडळाने वाहनांच्या हाती डिजिटल तिकीट मशिन दिले. त्यानंतर ही काही वाहकांचा पूर्वापार व्यवहारांसाठी अट्टहास कायम दिसतो. आनलाईन तिकीट घेताना बहुतांश वेळा नेट प्रॉब्लम येतो. या तांत्रिक कारणाचा बाऊ करत वाहक रोख तिकीट घेण्याचा दबाव टाकतात. व्यवहार अडकेल, तुम्हालाच त्रास होईल, लवकरच करा मला इतरांचेही तिकीट काढायचे आहेत, अशी पठडीतील वाक्य ऐकावयास मिळतात. याबाबत वाहनांचे वरिष्ठांनी प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रवासी सांगतात.

ऑनलाईन तिकीट व्यवहार सुविधा प्रवासी व वाहकांसाठी फायद्याची ठरत आहे. तरुण ते मध्यमवयीन सर्वांकडे मोबाईल असतो. त्यातील बहुतांश लोक यूपीआय वापरतात. त्यामुळे सुट्ट्या पैशांची समस्या निकाली निघत आहे.
अरुण सिया, विभागीय नियंत्रक, नाशिक.

आगारनिहाय आनलाईन तिकीट असे...

आगार-युपीआयद्वारे व्यवहार

नाशिक १ - ३,१४,२९,८७५

नाशिक २ - २८,२४,०००

मालेगाव -३५,८८,८६०

मनमाड - ११,४६,६१०

सटाणा - १४,७९,०८५

सिन्नर - ३७,१०,४३०

नांदगाव - ६,९३,२७०

इगतपुरी - १४,९६,८३५

लासलगाव - १४,८०,६३५

कळवण - ७,६८,५७५

पेठ - ११,९१,७८५

येवला - ११,०१,६९०

पिंपळगाव (ब.) - ९,३०,५५५

नाशिक विभाग - ५,१८,४२,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT