नाशिक : नाशिक महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांची अहिल्यानगर महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बदली झाली आहे.
दरम्यान, सांगली महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विद्या त्रिभूवन यांची नाशिक महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी शासन प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नाशिकरोड विभागीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपविली जाण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने १९ डिसेंबर २०२३ रोजी पाथरूट यांची प्रतिनियुक्तीने नाशिक महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी नियुक्ती केली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत ज्येष्ठ अधिकाऱ्यांची वानवा असताना दीड वर्षांतच पाथरूट यांची अहिल्यानगर महापलिकेत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेतील सहाय्यक आयुक्तपदाच्या रिक्त पदावर सांगली महापालिकेतून त्रिभूवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिभूवन यांनी सोमवारी महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे नाशिकरोड विभागीय अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात येणार असल्याची चर्चा होती.