नाशिक : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित नितीन उपासनी यांचा पाय आणखी खोलात जात आहे. भ्रष्टाचाराच्या आणखी गुन्ह्यामध्ये त्यास ताब्यात घेतले जाणार आहे. उपासनी यांच्यावर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यामुळे वारंवार त्याला पोलिस न्यायालयीन कोठाडीतून पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी नशिक ग्रामीणने केली आहे.
काही दिवसांपासून उपासनी मध्यवर्ती कारागृह आहेत. नाशिक शहरातील स्थानिक गुन्हे शाख्याने त्यास प्रथम अटक केली. त्यानंतर शहरातील दाखल गुन्ह्यांमध्ये त्यास जामीन मिळाला. मात्र, जामीन मिळताच काही क्षणातच नाशिक ग्रामीण पोलिसांनी थेट कारागृहामधूनच उपासनी यास उचलले. मालेगाव येथे गुन्हा दाखल असल्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
उपासनी मनपा शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक तसेच एसएससी बोर्ड अध्यक्ष अशा तीन पदांवर कार्यरत होते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. प्रत्येक पदावर कार्यरत असताना त्यामध्ये याचा काय सहभाग होता. याचा तपास पोलिस यंत्रणेला करावयाचा आहे. उपासनीने नेमके किती आयडी तयार केले. कोणकोण सहभागी आहे, याचा व्यापक तपास केला जाणार आहे. पोलिसांनी त्याच्या स्वाक्षरीचे नमुने जप्त करून एफएसएलकडे पाठवले आहेत.
भाऊसाहेब चव्हाण जामिनावर सोमवारी निर्णय
शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण या घोटाळ्यामध्ये सुरुवातीला फिर्यादी होते. मात्र, जसजसा तपास पुढे गेला. त्यानंतर त्यांचाही या भ्रष्टाचारामध्ये सहभाग असल्याची तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये संशयित करण्यात आले. सुरुवातीला ते फरार झाले त्यानंतर त्यांनी अंतरिम जामीनासाठी सोमवारी निर्णय होणार आहे.
उपासनीचे एजंट रडारवर
नितीन उपासनी शिक्षण विभागातील तीन प्रमुख पदांवर कार्यरत होते. त्यामुळे या काळामध्ये अनेक गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. हे सर्व कृत्य करत असताना एजंट जाळे त्याच्या भोवती निर्माण झाले होते. त्या माध्यमातून ही सर्व कामे केली जायची. त्यादृष्टीने ही पोलिस तपास सुरू आहे.