Nida Khan case pudhari
नाशिक

Nida Khan Nashik TCS Case | धर्मांतर आणि आर्थिक व्यवहारांचे गुपित उघडणार? निदा खानच्या परदेश दौऱ्यांचीही चौकशी सुरू

Nida Khan Nashik TCS Case | आर्थिक व्यवहार, परदेश दौरे, धर्मातराशी संबंधित बाबींवर अधिक भर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएस कंपनीतील अत्याचार व धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला एसआयटीची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तिची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या विशेष तपास पथकाने (दि.९) दिवसभर तिच्याकडे या प्रकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चौकशी केली.

चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः पीडित महिलांशी संपर्क, आर्थिक व्यवहार, परदेश दौरे आणि धर्मांतराशी संबंधित बाबींवर तपास पथकाने अधिक भर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. निदा खान हिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते.

त्यानंतर तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निदा खान गर्भवती असल्याने न्यायालयाने तिला आवश्यक औषधे घेण्यास परवानगी दिली असून, तिच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

तसेच तिची आई दिवसातून दोन वेळा भेटू शकते, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. चौकशीदरम्यान वैद्यकीय उपचारांबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यासाठी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर निदा खान फरार होती. तिने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्जी दाखल केला होता; मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला.

या प्रकरणातील चार आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, एसआयटीकडून तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आरोपींच्या मोबाइल, सोशल मीडिया संपर्क, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांचीही तपास यंत्रणांकडून पडताळणी सुरू आहे-पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT