Nayana Gunde, Commissioner, Tribal Development, Adivasi Vikas Bhavan file photo
नाशिक

Nayana Gunde | आश्रमशाळेत महिला अधीक्षिका अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांची देखभाल आणि सुरक्षेसाठी प्रत्येक आश्रमशाळेवर स्त्री अधीक्षिका कार्यरत असणे आवश्यक आहे. अधीक्षेकेचे पद रिक्त असल्यास प्राथमिक शिक्षिकेची स्त्री अधीक्षकपदावर नेमणूक करून तसा प्रस्ताव प्रकल्प अधिकार्‍यांकडे सादर करावा, असे निर्देश आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी दिले आहेत. (The issue of girls' safety has come to the fore once again)

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पेसा क्षेत्रातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षण घेतात. त्यांची सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी प्रत्येक आश्रमशाळेवर एकतरी महिला शिक्षिका अथवा अधीक्षका असावी याबाबत आदिवासी आयुक्तांनी (Nayana Gunde, Commissioner, Tribal Development, Adivasi Vikas Bhavan) कठोर निर्देश दिले आहेत.

कसूर आढळल्यास कठोर कारवाईचे सक्त निर्देश

विद्यार्थी-विद्यार्थिनींना घरगुती कामासाठी घरी बोलावल्यास तत्काळ निलंबित केले जाईल. अधिकारी किंवा कर्मचार्‍याकडून गैरवर्तन घडल्यास वरिष्ठांच्या तत्काळ निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. तत्काळ पोलिसांत तक्रार करावी. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. याबाबत कसूर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश १५ एप्रिलच्या पत्रकाद्वारे आदिवासी आयुक्तांनी दिले आहेत.

विद्यार्थिनींची देखभाल व सुरक्षेची जबाबदारी पालक या नात्याने आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांची असते. आश्रमशाळेत महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. अपर आयुक्तांनी बदलीची प्रक्रिया राबवितांना प्रत्येक आश्रमशाळेत महिला शिक्षिका असतील, याची काळजी घ्यावी.
नयना गुंडे, आदिवासी आयुक्त, आदिवासी विकास भवन, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT