Vegetable Fruit Price Hike  pudhari photo
नाशिक

Vegetable Fruit Price Hike | नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला आणि फळांच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Vegetable Fruit Price Hike | भाजीपाला, फळे महागाळी; कांदा 50, तर लसूण 200 रुपयांवर; दुष्काळाचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नवरोत्साच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला आणि फळांच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत असताना, दुसरीकडे ऐन सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे बाजारत महागाईची झळ अधिकच जाणवू लागली आहे.

कांदा, लसूण यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंपासून सफरचंद आणि केळीसारख्या फळांपर्यंत दर वाढल्याने गृहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. लसूणचे दर २०० ते २५० पर्यंत प्रतिकिलो आहेत.

नवरात्रोत्सात भाविकांचा उपवास असल्याने फळबाजारात अधिक पैसे मोजावे लागत आहेत. फळांच्या बाजारातही दरवाड कायम असून, सफरचंद प्रतिकिलो १८० ते २०० रुपये, तर सीताफळ सुमारे १४० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

केळी ४० ते ५० रुपये डझन, संत्री ३५ रुपये पावशेर, मोसंबी २० रुपये पावशेर, चिकू ३५ रुपये पावशेर आणि पेरू १०० ते १५० रुपये किलो आहे. रोजच्या जेवणातील भाज्या आणि सणासुदीच्या काळात खरेदी केली जाणारी फळांसाठीही उपवासामुळे गृहिणीवर्गाला ज्यादा खर्च करावा लागत आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाचा सर्वसाधारण दर प्रतिविंटल १४ हजार रुपये नोंदवण्यात आला होता. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांच्या उत्पादनावर आणि उपलब्धतेवर परिणाम होत असताना, सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी बाजारभावावर परिणाम करत आहे. परिणामी, ग्राहक आणि शेतकरी यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

भाज्यांचे दर असे...

  • टोमॅटो ४० रुपये किलो

  • हिरवी मिरची ८० रुपये किलो

  • कारले २० रुपये पाव

  • दोडका २० रुपये पाव

  • भेंडी २५ रुपये पाव

  • गवार ४० रुपये पाव

  • लिंबू ८५ रुपये किलो, प्रतिलिंबू ५ ते १० रुपये

  • काकडी २५ रुपये किलो

  • गाजर २७ रुपये किलो

  • वालपापडी ६५ रुपये किलो

  • घेवडा ३८ रुपये किलो

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरला सर्वसाधारण ६५ रुपये जुडी, मेथी ५०, तर शेपू ३० रुपये जुडी भाव मिळाला. ऐन सणासुदीच्या काळात घरगुती खर्च वाढलेला असतानाच भाजीपाला आणि फळांच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे आवश्यक तेवढी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असून, दिवाळी सणामध्ये तरी दर कधी कमी होणार, अशी आशा सर्वसामान्य ग्राहकांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT