नाशिक : सिन्नर तालुक्यातील मोह व चिंचोली येथे औद्योगिक नगररचना योनजेचा आराखडा पाहताना महानगर आयुक्त जलज शर्मा Pudhari News Network
नाशिक

Nashik's Industry News : नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार चालना

एनएमआरडीएतर्फे दोन औद्योगिक टीपी मोजणीचे काम अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणा (एनएमआरडीए) मार्फत सिन्नर तालुक्यातील मौजे मोह व चिंचोली येथे औद्योगिक नगर रचना (टीपी) योजना प्रस्तावित आहेत.

या नगररचना योजनांना 16-21 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासनाच्या राजपत्रान्वये प्रारूप नगररचना योजना मौजे चिंचोली क्रमांक 1 व 2 (औद्योगिक प्रयोजनार्थ) मंजुरी प्राप्त झाली आहे. या औद्योगिक नगररचना योजनांमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे महानगर आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले.

आयुक्त शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी समवेत महानगर नियोजनकार जयश्रीराणी सुर्वे, उपमहानगर अभियंता शरद साळुंखे, उपमहानगर नियोजनकार अथर्व खैरनार, सहाय्यक नियोजनकार शिवानी वामन व योजनेतील भूधारक उपस्थित होते.

प्रत्यक्ष जागेवर भूमी अभिलेख विभागामार्फत अंतिम भूखंडाची व रस्त्यांच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून जागेवर अंतर्गत रस्ते, विजेचे खांब, भूमिगत गटारी, पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत. योजनांमुळे पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक विकासाला चालना इत्यादी लाभ समाविष्ट भूधारकांना मिळणार असून या योजनांमुळे परिसरातीसह औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT